अनेकदा लोकांच्या मनात खेड्यातील स्त्रीची प्रतिमा स्वयंपाकघर सांभाळणारी, कमी शिकलेली व कुशल गृहिणी, अशी असते. पण, आता काळ बदलला आहे आणि सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीला एक व्यासपीठ देतो, जिथे ती जगाला आपले कौशल्य दाखवू शकते. सध्या याच बाबीचा प्रत्यय देणारा उत्तर प्रदेश येथील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामधील या महिलेचे फाडफाड इंग्रजी बोलणे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण- ही महिला सामान्य गृहिणी वाटत असली तरी तिच्या बोलण्यामुळे माहिती पडणारे सत्य पूर्णपणे वेगळे आहे हे लक्षात येते.

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. काही वेळा इथे मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात; जे खळखळून हसवतात आणि काही वेळा लोक इथे आपलं टॅलेंटही दाखवतात. हे टॅलेंट फक्त डान्स, गाणे किंवा अभिनय एवढ्यापुरतेच मर्यादित असेल, असे नाही; तर तुम्हाला आश्चर्य वाटेल असे टॅलेंटही अनेकदा इथे पाहायला मिळते. आता असेच टॅलेंट एका गावातील महिलेने दाखविले आहे. बोलण्यात फर्राटेदार इंग्रजीचा वापर आणि तिचा आत्मविश्वास पाहून तुम्हीही विचारातच पडाल.

(हे ही वाचा : राजस्थान आणि दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आलेले चाहते एकमेकांना भिडले, स्टेडियममधील मारामारीचा VIDEO व्हायरल )

ही महिला सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे आणि याचे कारण तिचे अस्खलित इंग्रजी वक्तव्य आहे. यशोदा नावाची ही महिला केवळ अस्खलितपणे इंग्रजी बोलत नाही, तर लोकांना इंग्रजी बोलायलाही शिकवते. हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ती इतकी शुद्ध इंग्रजी बोलत आहे.

यशोदाच्या इन्स्टाग्रामवर असे अनेक व्हिडीओ आहेत; ज्यात ती इंग्रजी शिकवताना दिसत आहे. यशोदा दिसायला अतिशय साधी आहे आणि बहुतेक व्हिडीओंमध्ये तिने डोक्यावर पदर घेतलेला दिसत आहे. तिचा प्रत्येक व्हिडीओ वेगळ्या विषयावरचा असतो. यशोदाचे हे व्हिडीओ युजर्सनाही खूप आवडतात. एक लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. प्रत्येक व्हिडीओवर लोक तिचे कौतुक करताना दिसतात.

येथे पाहा व्हिडिओ

तथापि, तिने तिच्या इन्स्टाग्राम बायोवर लिहिले आहे की, ती बारावी उत्तीर्ण आहे आणि कौशांबी येथे राहते. तिने हेदेखील सांगितले आहे की, ती एक गृहिणी आणि YouTuber आहे.

Story img Loader