सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातीलच क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवणारा यशराज मुखाटे. याच्या व्हिडिओंची ख्याती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील व्हिडिओ बऱ्याचदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अख्ख्या देशभरात धुमाकुळ घालणाऱ्या ‘रसोडे मैं कौन था’ या गाण्याच्या माध्यमातून तो बराच चर्चेत आला होता. नुकतंच सचिन तेंडुलकरसोबतही यशराजने कोलॅब केलं होतं. त्याने त्या गाण्याला पारंपारिक म्युझिक देत रंजक पद्धतीने बनवले होते. ‘रसोडे में कोन था’, ‘पावरी हो रही’ या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेल्या यशराज मुखाटे आता पुन्हा चर्चेत आला आहे. पण तुम्ही त्याचं नवीन गाणं ऐकलं आहे का?क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवणारा यशराज मुखाटे एक नवं गाणं घेउन आला आहे.
अर्चना गौतमचा डायलॉग वापरत दिला भन्नाट ट्रॅक
यशराज मुखाटे एक हटके असं नवं गाणं घेऊन पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी आला आहे. यात बिग बॉस १६ ची स्पर्धक अर्चना गौतमचा डायलॉग घेऊन यशराजनं हे नवं गाणं बनवलं आहे. या व्हिडिओमध्ये यशराज मुखावटे गाणं बनवताना दिसत आहे. अर्चना गौतम एका व्हिडीओमध्ये म्हणतेय, वयाचा काही फरक पडत नाही. हेच वाक्य घेऊन यशराजनं एक भन्नाट ट्रॅक वापरत गाणं बानवलं आहे.त्याचे अनेक क्रिएटिव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याने क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बराच काळ त्या व्हिडिओचा ट्रेंड कायम ठेवला होता.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – viral video: आरारा खतरनाक! महिलेने जमिनीवर लोळत केला नागिन डान्स अन्..क्षणातच
यशराज मुखाटे सोशल मीडियावर बराच चर्चेत असून त्याच्या विविध क्रिएटिव्हीटी आणि संकल्पना जाणून घेण्यासाठी तो आपल्या चाहत्यांसोबत गप्पाही मारतो. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अप्रतिम ट्रॅक पाहून लोक खूश झाले आहेत तर, कोट आणि बीट्समधील अचूक सिंक पाहून अनेकांना हसू आवरता आले नाही.