Viral Video : सोशल मीडिया अ‍ॅप इन्स्टाग्रामचा रील फिचर अनेक तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याच्या संधी देत असतात; तर काही जण या संधीचे सोनं करतात आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचतात. बऱ्याचदा लहान मुलांचे गाण्याचे, डान्सचे, अभिनयाचे विविध व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील; पण आज एका लहान मुलाचे अनोखे कौशल्य पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका चिमुकल्याने जिभेचा उपयोग करून एका प्रसिद्ध दुचाकीचा आवाज काढला आहे.

चिमुकला व्हिडीओत प्रसिद्ध मोटारसायकल यामाहा आरएक्स १०० चा (Yamaha RX 100) आवाज काढताना दिसून आला आहे; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चिमुकला सुरुवातीला आपले नाव सांगतो आणि तो यामाहा आरएक्स १०० चा आवाज काढून दाखवणार आहे असे म्हणतो व जिभेच्या मदतीने प्रसिद्ध दुचाकीचा आवाज काढायला सुरुवात करतो. जिभेच्या मदतीने चिमुकला अगदी हुबेहूब आवाज काढतो. मुलाने काढलेला आवाज पाहून तुम्हाला खरंच रस्त्यावरून मोटारसायकल जाते आहे असेसुद्धा जाणवेल. चिमुकल्याने यामाहा आरएक्स १०० चा ओरिजनल आवाज कसा काढला, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच..

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

हेही वाचा…भन्नाट! कलाकाराने जीभेवर रंग टाकून बनवली विराट कोहलीची पेंटिंग, Video पाहून लोक भडकले, म्हणाले…

व्हिडीओ नक्की बघा :

चिमुकल्याने काढला मोटारसायकल आरएक्स १०० चा ओरिजनल आवाज :

दुचाकी म्हणजे आजकालच्या तरुणांची पहिली पसंती. विविध कंपनीच्या दुचाकी शोरूममध्ये उपलब्ध असतात. काही दुचाकींचे ब्रँड, काही दुचाकींची रचना, तर काही दुचाकींचे विशिष्ट मॉडेल अनेक तरुणांना आकर्षित करतात. तसेच प्रसिद्ध दुचाकी यामाहा आरएक्स १०० सुद्धा अनेक तरुणांची पहिली पसंती आहे; तर आज या व्हिडीओत एका चिमुकल्याने आरएक्स १०० या मोटारसायकलचा आवाज काढत अनोखं कौशल्य दाखवताना दिसून आला. चिमुकल्याचे नाव ‘गोपाल संदीप आसुटकर’ असं आहे आणि हा यवतमाळ जिल्यातील वाणी तालुक्यातील सेलू या गावातील राहणारा आहे. तसेच महेश कापसे या तरुणाने या चिमुकल्याचे कौशल्य त्याच्या मोबाईलमध्ये टिपून घेतले आहे आणि आपल्या अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करून मुलाच्या कलेला दाद दिली आहे.

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @royal kasatkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून लिहिले आहे की, ‘गोपाल संदीप आसुटकर’ या चिमुकल्याने काढला आरएक्स १०० बाईकचा ओरिजिनल आवाज… आवाज आवडला असेल तर त्या चिमुकल्यासाठी एक लाईक नक्की करा, असे खास कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण ‘मुलगा काही दिवसांतच सेलिब्रिटी बनेल’, ‘चिमुकल्यामध्ये हे लपलेले टॅलेंट आहे’, ‘यामाहा आरएक्स १००; रिअल आयडीमधून येऊन बोल’ अशा मजेशीर कमेंट नेटकरी करताना दिसून येत आहेत आणि अनेक जण चिमुकल्याच्या या अनोख्या कलेला दाद देताना दिसून आले आहेत.

Story img Loader