सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा वापर करून प्रवास करणे दिवसेंदिवस अवघड होत चालला आहे. वाढती लोकसंख्या पाहता उपलब्ध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. बस असो , रेल्वे असो मेट्रो असो किंवा विमान जिथे तिथे प्रवाशांची फक्त गर्दीच पाहायला मिळते. पैसे भरूनही प्रवाशांना नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. बसमध्ये रोज बसचे धक्के खात अनेक लोक प्रवास करत आहेतच पण रेल्वे अन् मेट्रोमध्येही प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या प्रंचड गर्दीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील आता हीच अवस्था मेट्रोची देखील झाली आहे. कॅनडातील मेट्रो स्थानकावर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेला आला आहे. इंस्टाग्राम हँडल @battrytings द्वारे शेअर केलेला व्हिडिओमध्ये, अनेक लोक मेट्रो ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळाची स्थिती झाल्याचे दिसते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओची सुरुवात काही भारतीय प्रवासी देखील दिसत आहे. हे प्रवासी मेट्रोमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसा प्लॅटफॉर्मवरील प्रवशांची गर्दी दिसत आहे. व्हिडीओतील डिस्प्ले बोर्डवर ईस्टबाउंड आणि वेस्टबाउंड फ्लॅशिंग दिसते. “कॅनडामधील मेट्रो. तुमच्या काही लक्षात आले का?” असे कॅप्शन व्हिडिओवर दिसत आहे.

हेही वाचा – शेतात पडली वीज अन् निळ्या रंगाचं झालं पाणी? काय आहे Viral Videoचं सत्य

इंस्टाग्रामवर गेल्या महिन्यात शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया समोर आला ज्यामुळे नवा वाद सुरू झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने कमेंट केली, “जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा त्यांनी भारताला इतर देशांवर आक्रमण करायला शिकवले.” “हा तर राजीव चौक आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्याने लिहिले, “कॅनडा मेट्रो – चूक, दादर रेल्वेस्टेशन -बरोबर”

हेही वाचा – चिलीम-तंबाखू,शिरा-पुरी की खांब-खांब, तुम्ही या खेळाला काय म्हणायचा? Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी होतील जाग्या

एकाने लिहिले, “मला माहित नाही की, “काही लोकांना भारतीय वंशाच्या परदेशी लोकांची काय समस्या आहे. समाजासाठी भरपूर योगदान द्या आणि जास्तीत जास्त कमवातात, त्यांचा कर वेळेवर भरतात. त्यावर उत्तर देताना एकाने लिहिले,”हा भारताचा द्वेष नाही. मुद्दा हा आहे कीस कॅनडाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याऐवजी भारत असल्यासारखे वागत आहेत. कॅनडाने त्यांच्याशी जुळवून घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.” आणखी एकाने उत्तर दिले की, “कामासाठी येणाऱ्या परप्रांतीयांचा कोणालाच प्रश्न नाही. पण जे लोक स्वस्तात काम करायला येतात, आणि सगळ्यांसाठी वातवरण खराब करतात, अनिष्ट परिस्थितीत जगतात आणि सगळ्यांचे जीवनमान बिघडवतात”

“भारतीयांबद्दल बोलण्याआधी, गौर वर्णीय अमेरिकन (white-americans) लोकांना युरोपमध्ये परत आणा,” असा युक्तिवाद एका वापरकर्त्याने केला.

गेल्या महिन्यात, पश्चिम लंडनच्या रुईस्लिपमध्ये बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांच्या व्हिडिओने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीतांवरून वाद निर्माण केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन गोऱ्या, मध्यमवयीन महिलांनी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना गर्दीकडे पाहत असल्याचे दाखवले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeh to rajiv chowk hai viral video shows stampede like situation at metro station in canada netizens react snk