ग्राहकांना घरी जाऊन सलून सेवा देणाऱ्या येस मॅडम या कंपनीने कामाच्या ठिकाणी तणाव जाणवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला असून त्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निर्णयाची घोषणा करणाऱ्या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापकाच्या (Human Resources department manager ) ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंपनीने प्रथम एक मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण केले आणि त्यानंतर कामाच्या ठिकाणी “महत्त्वपूर्ण तणाव” अनुभवत असलेल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“येस मॅडम काय चाललंय? प्रथम, तुम्ही रँडम सर्वेक्षण करता आणि नंतर आम्हाला रात्रीत कामावरून काढून टाकता कारण आम्हाला कामाचा तणाव जाणवत आहे म्हणून? आणि फक्त मलाच नाही तर इतर १०० लोकांनाही काढून टाकण्यात आले आहे, “मानसिक आरोग्य सर्वेक्षणानंतर काढून टाकलेल्या येस मॅडम कर्मचाऱ्याने लिहिले.

येस्माडम येथे कॉपी रायटर असलेल्या अनुष्का दत्ताने कर्मचाऱ्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाकडून मिळालेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला.

हेही वाचा – आता फक्त कपडे नव्हे तर माणसांनाही मशीनमध्ये धुता येणार? जपानी कपंनीने तयार केली माणसांना धुणारी मशीन

“प्रिय टीम,

नुकतेच, कामावरील तणावाबद्दल तुमच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण केले. तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या समस्या व्यक्त केल्या ज्याचा आम्ही मनापासून आदर करतो.

निरोगी आणि आश्वासक कामाचे वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध कंपनी म्हणून, आम्ही अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केला आहे. कामावर कोणीही तणावग्रस्त राहू नये याची खात्री करण्यासाठी, आम्ही महत्त्वपूर्ण तणाव दर्शविणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ लागू होईल आणि प्रभावित कर्मचाऱ्यांना अधिक तपशील स्वतंत्रपणे दिले जातील.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.

शुभेच्छा,
एचआर मॅनेजर,
येस मॅडम”

पण अद्याप या ईमेलच्या व्हायरल स्क्रीनशॉटची सत्यता स्वतंत्रपणे सत्यापित करण्यात आलेली नाही.

हेही वाचा –मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

नेटकरी संतापले

व्हायरल स्क्रीनशॉटवर टीका करताना एका वापरकर्त्याने म्हटले, “सर्वात विचित्र कर्मचारी कपात: येस मॅडम कामाच्या ठिकाणी तणावाचे सर्वेक्षण करतात. जे कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे सांगतात त्यांना काढून टाकले जाते.

“म्हणून, अलीकडे YesMadam नावाच्या स्टार्टअपने टीम सदस्यांना एक सर्वेक्षण पाठवले की, ते किती तणावात आहेत आणि? अंदाज लावा, ज्यांनी मतदान केले त्यांना काढून टाकले ते अत्यंत तणावाखाली आहेत,” दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes madam fires over 100 employees for feeling stressed at work viral email claims snk