योगगुरू बाबा रामदेव अनेकदा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेकदा त्यांच्या आयुर्वेदिक औषधांवरही आक्षेप घेतल्याचं दिसून आलं. पतंजलीच्या व्यापक व्यवसाय वृद्धीमुळे रामदेव बाबा कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात त्यांच्या तोंडी असणारे संवाद चर्चेचा व पर्यायाने वादाचा विषय ठरले आहेत. ३० सेकंदाचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला जात असून त्यावर #बाबारामदेवमाफ़ी_मांगो असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ एका वाहिनीवरचा असून त्यात रामदेव बाबा प्रवचन देताना दिसत आहेत. बाबा रामदेव यांच्या प्रवचनातला फक्त २९ सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सुरुवात बाबा रामदेव “मेरा पूर्व गोत्र ब्रह्म गोत्र है” असं म्हणताना होत आहे. पुढे “मैं अग्निहोत्री ब्राह्मण हूँ मैं. बोले बाबाजी आप तो ओबीसी हो. ओबीसीवाले ऐसी-तैसी कराए. मैं हूँ अग्निहोत्री ब्राह्मण, मैं हूँ वेदी ब्राह्मण, मैं हूँ द्विवेदी ब्राह्मण, मैं हूँ त्रिवेदी ब्राह्मण और मैं हूँ चतुर्वेदी ब्राह्मण.. चार वेद मैंने पढे है”, असं बाबा रामदेव म्हणत असल्याचं या व्हिडीओत ऐकू येत आहे.

sonu nigam
Video : “…तर तुम्ही निवडणुकीत उभे राहा”, कोलकातामधील कॉन्सर्टमध्ये सोनू निगमचा संताप अनावर; पाहा व्हिडीओ
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Arvind Kejriwal Old Video
Arvind Kejriwal Old Video : “मोदीजी या जन्मात तरी दिल्लीत…”, अरविंद केजरीवालांचा भाजपाला आव्हान देणारा जुना Video Viral
udit narayan again lip kissed female fan video viral
Video: काय चाललंय? उदित नारायण यांनी पुन्हा चाहतीच्या ओठांचं घेतलं चुंबन; नेटकरी म्हणाले, ‘सीरियल KISSER’
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!

व्हिडीओ व्हायरल, ट्रोलिंग सुरू

बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ सध्या एक्सवर (ट्विटर) तुफान व्हायरल होत आहे. बाबा रामदेव यांनी ओबीसी समुदायाचा अवमान केल्याचा दावा अनेक युजर्स करत आहेत. तसेच, #बाबारामदेवमाफ़ीमांगो, #मुझेओबीसीहोनेपरगर्वहै असे हॅशटॅगही ट्रेंड होताना दिसत आहेत.

”…तर फाशी द्या, आम्ही तयार, खोटा प्रचार करत नाही”; रामदेव बाबा यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओची सत्यासत्यता?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला, तरी याची सत्यासत्यता अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भात बाबा रामदेव यांच्याकडून वा पतंजलीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. शिवाय, या व्हिडीओतील वाक्ये ही बाबा रामदेव प्रवचनामध्ये स्वत:ची म्हणून सांगत होते की इतर कोणत्या प्रसंगाचं विश्लेषण करताना सांगत होते, याविषयीही अद्याप कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही.

Story img Loader