‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ दरवर्षी २१ जूनला जगभरात साजरा केला जातो. भारतातसुद्धा आज लोकांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा केला. अनेक ठिकाणी लोक योगा करताना दिसून आले. अशातच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही प्रवासी ट्रेनच्या डब्यात योग करताना दिसून आले. सध्या प्रवाशांचा योग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
२०२२ पासून ‘हिल स्टेशन’ ही संस्था ट्रेनमध्ये योग करण्याची मोहीम राबवत आहे. या वर्षीही या संस्थेने पुढाकार घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांसोबत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला. या संदर्भात पश्चिम रेल्वेच्या @WesternRly या अधिकृत अकाउंटवरून योग दिवसाच्या फोटो शेअर करीत माहिती देण्यात आली आहे तर एएनआयनेसुद्धा या संदर्भात व्हिडीओ ट्वीट केला आहे.
हेही वाचा : चालत्या बाइकवर कपलचा रोमान्स, सोशल मीडियावर Video Viral
प्रवाशांना प्रवासाची वेळ सुदृढ आरोग्यासाठी वापरता यावी, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या वर्षी योग दिवसाची थीम ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे.