गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ४१ वर्षीय योगेंद्र उर्फ योगी जपानमधून निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’साठी निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी निवडणूक जाहिरनाम्याने अनेकांची मने जिंकली आहेत. या जाहिरनाम्यामध्ये योगेंद्र यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण मिळावे अशा अनेक मुद्दांचा समावेश केला आहे. हे मुद्दे जपानमधील नागरिकांसाठी फार महत्वाचे असल्याचे योगेंद्र यांनी सांगितले.

योगेंद्र हे माजी बँक कर्मचारी असून ते जपानमधील इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या विभागात जवळजवळ ४ हजार ५०० भारतीय स्थायिक आहेत. गेल्या १० वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत.

१९९७ साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. त्यांनी Mizuho बँकेत शेवटची नोकरी केली. योगी गेल्या २० वर्षांपासून जपानमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यातील १५ वर्षे त्यांनी इडोगाव येथे घालवली आहेत.

Story img Loader