पुण्यातील योगेंद्र उर्फ योगी यांनी जपानमधील निवडणूक जिंकत इतिहास रचला आहे. ४१ वर्षीय योगी जपानमधून निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले आहे. टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीमध्ये योगेंद्र यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीसाठी २१ एप्रिल रोजी मतदान झाले तर २३ एप्रिल रोजी त्याचा निकाल लागला. या निवडणुकीत योगेंद्र यांना ६४७७ मतांनी विजय मिळवला आहे.
योगेंद्र हे मुळचे पुण्याचे रहिवासी रहिवासी आहेत. त्यांनी इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवली आहे. येथे जपामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच योगींना येथून विजय मिळवता आला. त्यांना मिळालेली मते ही तेथील २,२६,५६१ मतांमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत.
निवडणूकीपूर्वी योगी यांनी निवडणूक जाहिरनाम्याने अनेकांची मने जिंकली आहेत. या जाहिरनाम्यामध्ये योगेंद्र यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण मिळावे अशा अनेक मुद्दांचा समावेश केला आहे. हे मुद्दे जपानमधील नागरिकांसाठी फार महत्वाचे असल्याचे योगेंद्र यांनी सांगितले. तसेच जपानमध्ये २०११ साली आलेल्या भूकंपानंतर मी केवळ जपानच्या नागरिकतेपूरतेच मर्यादीत न राहता येथील राजकीय विश्वाचा भाग बनविण्याचे निश्चित केल्याचे पुराणिक यांनी म्हटले आहे.
योगेंद्र हे माजी बँक कर्मचारी असून गेल्या १० वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत. १९९७ साली योगी शिक्षणा निमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. त्यांनी Mizuho बँकेत शेवटची नोकरी केली. योगी गेल्या २० वर्षांपासून जपानमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यातील १५ वर्षे त्यांनी इडोगाव येथे घालवली आहेत.