UP & Hariyana CM To Be Changed Viral Claim: भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्या नावाचे एक पत्र लाइटहाऊस जर्नलिझमच्या समोर आले. पत्रातील मजकूरात म्हटले आहे की, ‘मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना २०२४ च्या शेवटच्या महिन्यात उत्तर प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री बनवावे. तर २०२४ मध्ये हरियाणाचे पुढील मुख्यमंत्री हे योगी आदित्यनाथ असतील. हे पत्र लेटरहेडवर लिहिलेले होते आणि त्यावर के अन्नामलाई यांची स्वाक्षरी होती. अण्णामलाई यांचा तामिळनाडूमधून पराभव झाल्यावर या पत्राची चर्चा रंगली आहे. नेमकं यात किती तथ्य आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Akash Yadav ने बनावट पत्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील पत्र शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही रिव्हर्स इमेज सर्च वापरून आमचा तपास सुरू केला आणि आम्हाला आढळले की भाजपा तामिळनाडूच्या सोशल मीडिया हँडलने आणि अगदी भाजप नेते के अण्णामलाई यांनीही पूर्वी लेटरहेड शेअर केले होते. व्हायरल झालेल्या पत्रातील मजकुराचे व्याकरण चुकीचे असल्याचेही आमच्या लक्षात आले.

रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला एक समान दिसणारे लेटरहेड सापडले.

लेटरहेडवरील मजकूर वेगळा होता परंतु स्वाक्षरीसह उर्वरित भाग सारखाच दिसत होता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही के अण्णामलाई यांच्या स्वीय सचिवांशी संपर्क साधला. व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा<< “देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क..”, योगी आदित्यनाथ यांच्या Video ने भुवया उंचावल्या; माजी पंतप्रधानांचा संबंध काय?

निष्कर्ष: भाजपचे तामिळनाडू प्रमुख के अण्णामलाई यांच्या नावाने व्हायरल होत असलेलं पत्र बनावट आहे. शिवराज सिंह चौहान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि योगी आदित्यनाथ हरियाणाचे मुख्यमंत्री व्हावेत असे पत्र त्यांनी जारी केले नाही.