WhatsApp update: मोबाईल हातात घेतल्याशिवाय लोकांची सकाळ होत नाही, असं म्हणतात. ते खरंच आहे. कारण व्हाट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप असून प्रत्येक माणसाच्या स्मार्ट फोनमध्ये WhatsApp नक्कीच पाहायला मिळतं. दिवसेंदिवस व्हाट्सअॅपवर फिचर्स येत असल्याने युजर्सला त्याचा फायदा होतो. असाच भन्नाट फिचर व्हाट्सअॅपने बिझनेस अकाउंट्ससाठी जोडला आहे. हा फिचर इतका जबरदस्त आहे की, तुम्ही युजरच्या नंबरशिवाय त्याचा नावाचा वापर करून त्याला सर्च करू शकता. एव्हढच नाही तर तु्म्ही व्हाट्सअॅपवर शॉपिंगही करू शकता. जाणून घेऊयात या भन्नाट फिचरबाबत.
कोणत्या युजर्सला मिळणार नवीन फिचर?
या फिचरमुळं युजर्सला व्हाट्सअॅप बिझनेसवर लोकांना शोधता येऊ शकतं. त्यांच्याशी चॅटही करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही व्हाट्सअॅपर शॉपिंगही करू शकता. व्हाट्सअॅप बिझनेस युजर्स, विविध कॅटेगरीतील बॅंकिंग, ट्रॅवलमध्ये नावाच्या सहाय्याने दुसऱ्या युजरला सर्च करू शकता. दरम्यान, व्हाट्सअॅपचा हा फिचर काही मोजक्याच देशांमध्ये लॉंच केला आहे. कंपनीकडून या फिचर्सला ब्राझील, कोलंबिया, इंडोनेशिया, मेक्सिको आणि इंग्लंडमध्ये लॉंच केलं आहे. कंपनीने या फिचरची सर्व माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. हा नवीन फिचर बिझनेस प्रोफाईलवर सहजरित्या बिझनेसेसला संपर्क साधण्यात मदत करील. यासाठी युजर्सला बिझनेस अकाउंटचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. तसंच व्हाट्सअॅपवर युजर्सला शॉपिंग करणे सहज शक्य होणार आहे.
व्हाट्सअॅपवरही शॉपिंग करू शकता
युजर्स बिझनेस अकाउंटच्या माध्यमातून शॉपिंग करू शकतात. त्यांना कंपनीच्या वेबसाईट्सवर जाण्याची आवश्यकता नाही. काही दिवसांनी कंपनीने जियो मार्टसोबत एक फिचर लॉंच केलं होतं. या फिचरचा वापर दुसऱ्या देशांमध्ये होत आहे. आताचा नवीन फिचर हा युजर्ससाठी सेफ आहे. तसंच त्यांच्या खासगी गोष्टींबाबतही काळजी घेणारा आहे. याचसोबत युजर्सला व्हाट्सअॅपवर पेमेंटचाही विकल्प मिळणार आहे. म्हणजेच कोणत्याही महत्वाच्या गोष्टींसाठी युजरला व्हाट्सअॅपच्या बाहेर जाण्याची आवश्यकता लागणार नाही. या अॅपवर युचर्सला संपूर्ण इकोसिस्टम देण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
‘असं’ काम करणार नवीन फिचर
व्हाट्सअॅपवर दुसऱ्या युजरसोबत चॅट करण्यासाठी त्याच्या नंबरची आवश्यकता लागणार नाहीय. पण नवीन फिचर बिझनेस युजर्ससाठी फायदेशीर ठरणारा आहे. या फिचरच्या मदतीनं युजर्स कोणत्याही कॅटगेरीमधील दुसऱ्या युजर्सला त्याच्या नावाने सर्च करु शकतो. नंबर नसतानाही त्यांच्याशी चॅट करू शकता. तसंच व्हाट्स अॅपवर शॉपिंगही करू शकता. यासाठी युजर्सला व्हाट्सअॅप पेमेंटचा विकल्पही मिळेल.