सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस आणि एका व्यक्तीमध्ये वाद होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तेलंगणाचा असल्याचं कळतंय. या व्हिडीओमधील व्यक्तीने आरोप केला आहे की महबूबाबाद जिल्ह्यात एका पोलिसाने त्याला मारहाण केलीय. या व्यक्तीसोबत आठ वर्षांची मुलगीही आहे. त्याच्या आठ वर्षाच्या मुलीसमोर या पोलिसाने त्याच्या कानशिलात लगावली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर पोलीस आणि त्या व्यक्तींमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागलाय. या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुद्धा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, उपनिरीक्षक पदावरील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एका व्यक्तींमध्ये कसला तरी वाद सुरू असल्याचं दिसून येतंय. एका आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन आलेल्या या व्यक्तीचं नाव श्रीनिवास असं असल्याचं कळतंय. श्रीनिवास आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह भाजी खरेदी करण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. त्यावेळी हेल्मेट न घातल्यामुळे या पोलीसाने त्याला थांबवलं आणि त्याच्या आठ वर्षाच्या मुलीसमोरच त्याला कानशिलात मारली असल्याचा दावा या व्यक्तीने केलाय. आपल्या आठ वर्षाच्या मुलीला हाताशी धरून हा व्यक्ती पोलीसाला याबाबत वारंवार जाब विचारताना दिसून येतोय.
“पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब विचारत यावर श्रीनिवास पोलिसांशी वाद घालताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये श्रीनिवास तेलुगु भाषेत बोलत असल्याने आपल्याला भाषा समजणार नाही, पण त्याच्या आणि आठ वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिल्यानंतर कोणत्याही भाषेची किंवा शब्दाची गरज पडत नाही. “पोलीस थांबवू शकतात, दंड सुद्धा आकारू शकतात, पण मारू शकत नाहीत. मला का मारलं?” असं श्रीनिवास वारंवार या व्हिडीओमध्ये तेलुगु भाषेत बोलताना दिसून येत आहे. पण, पोलिसाने त्याला कानशिलात मारल्याचा अद्याप कोणताही व्हिडीओ मात्र समोर आलेला नाही.
आणखी वाचा : VIRAL : हे काय? चक्क एअरपोर्टवरच मॉडेलने न्यूड होऊन केलं असं काही की पाहून व्हाल हैराण…
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
श्रीनिवासचं हे म्हणणं ऐकून ये-जा करणारे लोक तिथे जमतात आणि त्याला साथ देतात. काही लोक पोलिसांशी झालेल्या वादाचे व्हिडीओ बनवू लागतात. त्यानंतर पोलीस इथल्या जमावाला हटवताना दिसून येत आहेत. हे पाहून श्रीनिवासची मुलगी घाबरते आणि रडू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न सुरू असताना स्टेजवर प्रियकराची एन्ट्री, नवरदेवासमोरच प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरलं आणि….
जिल्हा पोलिस प्रभारी कोटी रेड्डी यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने मुनिरुल्लाला शिवीगाळ केली. मुलीचा जबाब दुसर्या व्हिडीओमध्ये आहे. यामध्ये ती म्हणते की तिच्या वडिलांना थांबवलं गेलं आणि हेल्मेट न घातल्याबद्दल तिच्या वडिलांना फटकारलं. तसंच त्याच्या दुचाकीच्या चाव्या हिसकावून घेतल्याचं देखील सांगितलं. तिच्या वडिलांनी विरोध केल्यावर उपनिरीक्षकाने त्याला कानशिलात मारली, असं देखील मुलीच्या जबाबात म्हटलंय.