लग्न हा एखाद्याच्या आयुष्यातील अत्यंत खास दिवस असतो आणि प्रत्येकाला हा दिवस आणखी खास करायचा असतो. कित्येकजण लग्नाचा दिवस खास बनविण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना घेऊन येत असतात. कोणी डोंगर दऱ्यांच्या सानिध्यात लग्न गाठ बांधते, तर कोणी समुद्र किनारी. डेस्टिनेशन वेडिंगचा हा ट्रेंड हा आता सामान्य झाला आहे. पण तुम्हाला आता असं कोणी सांगितलं, की तुम्ही पृथ्वीपासून १,००,००० फूट उंचीवर अवकाशामध्ये जाऊन लग्न करु शकता तर…? ही कल्पना किती भन्नाट आहे ना. तुम्हाला म्हणालं की, या सर्व गोष्टी कल्पनेत चांगल्या वाटतात, पण प्रत्यक्षात असं थोडीचं घडणारं आहे? तुम्हाला असे वाटणे सहाजिक आहे पण आता ही कल्पना लवकरच सत्यात उतरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेस पर्स्पेक्टिव्ह नावाने ओळखल्या जाणार्‍या कंपनीने जोडप्यांना त्यांच्या आयुष्यातील मोठा दिवस आणखी खास करण्याची संधी देणार आहे. अवकाशात लग्नाची स्वप्नवत वाटणारी कल्पना सत्यात आणण्याचे काम ही कंपनी करणार आहे. ही प्रशस्त खिडक्यांनी सुसज्ज कार्बन-न्यूट्रल फुगा तयार करणार आहे जो पृ्थ्वीच्या कक्षेत पाठवणार आहे. या प्रशस्त खिडक्यामुळे तुम्हाला पृथ्वीच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येणार आहे. अशाप्रकारे तुम्हाला अवकाशात लग्न करण्याची संधी ही कंपनी देणार आहे.

हे कसे काम करते.?

कंपनीद्वारे स्पेस बलूनने नेपच्यून अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करते आणि कार्बन फूटप्रिंटचा वापर न करता अक्षय हायड्रोजनच्या मदतीने चालवले जाते. सहा तासांच्या अतंराळायान नेपच्यूनचे उड्डान सर्वात आश्चर्यकारक असणार आहे कारण हे पाहुण्यांना पृथ्वीपासून १,००,००० फुट उंच घेऊन जाऊ शकते आणि पुन्हा खाली घेऊन येऊ शकते. ही सुविधा २०२४पर्यंत सुरु करण्याची योजना आखली जात आहे आणि पहिली १००० तिकीटांची विक्री देखील झाली आहे.

हेही वाचा – मासेमारी करणारा महाकाय कोळी! अशी करतो भक्ष्याची शिकार, व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

काय सुविधा मिळणार?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लोक फ्लाइट दरम्यान पूर्ण आनंद घेऊ शकतात. ते कॉकटेलचा आनंद घेऊ शकतात, तसेच सहप्रवाशांसह गप्पा मारू शकतात आणि आपली प्लेलिस्ट निवडू शकतात.”

कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, “साहजिकच, आमच्या कॅप्सूलमध्ये अविस्मरणीय दृश्यांसह संपूर्ण सुसज्ज स्वच्छतागृह आहे. स्पेस लाउंजमधून अंतराळायानाच्या सर्वात मोठ्या खिडक्यांमधून 360-डिग्रीमध्ये अतंराळातील आश्चर्यकारक दृश्यांचा आंनद घेता येईल.हाय स्पीड वाय- फाय कनेक्शन तुम्हाला तुमचे कुटुंब आणि मित्रांना पृथ्वीवर परत आणण्यास मदत करेल देईल.”

वेबसाइच्या माहितीनुसार, “तुमच्या उड्डाणांमध्ये मेन्यु आणि कॉकटेल, ऑनलाइन बोर्ड, साउंडट्रॅक आणि लाइटपर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्हाला वैयक्तिक प्राधान्य दिले जाईल. एक्सप्लोरर्स जे एक पूर्ण कॅप्सूल आरक्षित करतात, त्यांना लाउंजच्या मॉड्यूलर डिझायनिंगमध्ये बसण्याच्या रचनेत बदल करु शकतात आणि अतिथ्यासाठी अतिरिक्त सुविधा समाविष्ट करू शकतात. उदा. अनोख्या खाद्यसेवेसाठी टेबल आरक्षित करणे यासारख्या…”

नेपच्यूनची चढाई अवकाशाच्या काठावर पृथ्वीच्या वातावरणाच्या ९९% च्या वर होईल. तुम्हाला पृथ्वीची वक्रता, अंतराळातील काळोख आणि वातावरणाची पातळ निळी रेषा पाहण्यासाठी आणि अंतराळवीरासारखा उत्कृष्ट अनुभव घेण्यासाठी दोन तास मिळतील. तुमच्या प्रवासाचा कारण कोणतेही असो तुम्ही तुमचे अंतराळातील हे क्षण चांगल्या आठवणी तुम्हाला देतील.

हेही वाचा – गोव्यामध्ये बिअर इतकी स्वस्त का मिळते? इतर राज्यांच्या तुलनेत एवढा फरक असण्याचे कारण जाणून घ्या

ते सुरक्षित आहे का?

त्यात म्हटले आहे की, त्याचे नेपच्यून अंतराळ यान नवविवाहित जोडप्यांना एक संस्मरणीय अनुभव देणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्हचे सह-संस्थापक जेन पॉयन्टर यांनी सांगितले की, ताऱ्यांमध्ये लग्न करण्याची यादी पूर्वीपेक्षा जास्त मोठी झाली आहे. आमच्याकडे आधीपासूनच असे लोक आहेत ज्यांना सर्वात पहिल्यांदा अंतराळात लग्न करायचे आहे, म्हणून आम्ही पहिले जोडपे कोण असेल ते पाहू,” असे त्याने कूल डाउनला सांगितले.

इतर सर्व स्पेसक्राफ्टच्या विपरीत, जेथे क्रू कंपार्टमेंट उड्डाणाच्या मध्यभागी एका उड्डाण प्रणालीपासून वेगळे होते आणि दुसर्‍या उड्डाण प्रणालीमध्ये हस्तांतरित केले जाते, पण स्पेसशिप नेपच्यूनची कॅप्सूल लिफ्टऑफपासून स्प्लॅशडाउनपर्यंत संपूर्ण उड्डाण स्पेसबलूनसाठी सुरक्षित आहे, जे सहज, सुरक्षित आणि सुरळीत उड्डाण करते.”

पॉयन्टरचा दावा आहे की कॅप्सूल जेवणाच्या खोलीत टेबल किंवा लग्नाच्या विधी सामावून घेऊ शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can now get married in space 100000 feet above earth know when the facility of space wedding will start snk
Show comments