आपल्याकडे लहान मुलांना देवाचं रूप मानलं जात. तसेच, ‘मुलं ही देवा घरची फुलं’ असेही म्हणतात. लहान मुलं मनाने खूपच निर्मळ आणि निरागस असतात. पण कधीकधी ते असं काही बोलतात ज्यामुळे आपल्याला हसावं की रडावं हेच समजेनासं होतं. लहान मुलांना खेळायला आणि मजा मस्ती करायला फार आवडतं. पण अभ्यासाला बसणं त्यांना अजिबात आवडत नाही. अभ्यासापासून पळण्यासाठी ते अनेक कारणं शोधून काढतात. मात्र, हट्टी पालक असतील तर मुलांना अभ्यास करावाच लागतो. त्यावेळी या मुलांची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका त्रासलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा मुलगा आपल्या आईकडे तक्रार करत आहे. त्याला अभ्यास करावा लागत असल्याने तो त्रासला आहे. या मुलाचं बोलणं ऐकून तुम्हाही पोट धरून हसाल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा अभ्यास करताना दिसत आहे. एका खोलीत तो वहीवर पेन्सिलने काहीतरी लिहिताना दिसतो. मात्र, त्याला अभ्यासात अजिबात रस नाही, हे त्याच्या वागण्यावरून समजते.

‘तू आयुष्यात काहीही करू शकणार नाही’ असे म्हणणाऱ्या शिक्षिकेला विद्यार्थिनीने दिले चोख उत्तर; सोशल मीडियावर पोस्ट Viral

जेव्हा अभ्यास करायचा नसेल तेव्हा मुलं आपल्या पालकांशी गप्पा मारून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. हा मुलगाही आपल्या आईशी बोलताना दिसत आहे. यावेळी तो खूपच त्रासलेला आहे. तो बोलत असतानाच त्याच्या आईने मोबाइलचा कॅमेरा सुरु करून या मुलाचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. यादरम्यान या मुलाने असे काही म्हटले आहे जे ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगा त्याच्या आईला म्हणतो, ‘मम्मी, मी वैतागलो आहे. मला या जगात का आणले? मी हे जग सोडून जाईन. मी निघून जाईन. हे बोलत असताना मुलगा त्याच्या वहीवर जोरजोरात पेन्सिल मारायला सुरुवात करतो.

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

यादरम्यान आई त्याला विचारते, तुला का जायचे आहे? तर मुलाने उत्तर दिले, ‘मला या जगात मन लागत नाही.’ यानंतर आईने त्याला विचारले की ‘तुला हे जग का आवडत नाही.’ त्यावर तो म्हणतो की ‘कारण तू वाईट आहेस.’

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडीओला साडेचार लाख साडेचार हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दैविक शर्मा नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

Story img Loader