Malala Yousafzai Viral Post: नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजाईने एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याचं कारण ही पोस्ट मलालाने तिच्या पतीच्या मळक्या मोज्याविषयी लिहिली आहे. ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. मलाला युसुफजाईने लग्नानंतर तिच्या आयुष्यातल्या या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यावरून लोक चांगलीच चर्चा करु लागले आहेत.

काय म्हटलं आहे मलाला युसुफजाईने?

सोशल मीडियावर मलाला युसुफजाईने आपल्या ट्विटरवरून ट्विट केलं आहे. त्यात लिहिलं आहे की सोफ्यावर मोजे मिळाले आहेत. असर मलिक हे मला तुम्ही सांगा हे तुमचेच आहेत ना ? जर तुम्हाला हे मळकट मोजे दूर ठेवायचे होते ना मग मी ते मोजे कचरा पेटीत टाकले आहेत. या आशयाचं एक ट्विट मलालाने केलं आहे. या ट्विटवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. मलालाचं हे ट्विट १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे तर ९ हजारहून जास्त लोकांनी हे ट्विट लाइक केलं आहे. तर २६० हून अधिक लोकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. तसंच लोक मलालाचं कौतुकही सोशल मीडियावर करत आहेत.

पोस्टनंतर काय म्हणत आहेत युजर्स?

या पोस्टनंतर युजर्सच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी मलालाचं याबाबत कौतुक केलं आहे. एक युजर म्हणतो वैवाहिक आयुष्यात मलालाचं स्वागत आहे. सोफ्यावर मळकट मोजे असण्याची गोष्ट ही वादाचं नवं मूळ ठरू शकते आणि तेवढीच योग्यही. आणखी एक युजर म्हणतो मलाला तुम्ही ज्या शब्दात आपल्या पतीला सांगितलं आहे आता तो पुन्हा तिथे मोजे ठेवणं शक्यच नाही. एक युजर म्हणतो घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त मलालाची नाही तर तिच्या पतीचीही आहे.

कोण आहे मलाला? आणि तिचे पती असर मलिक?

मलाला युसुफजाईला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मलाला ही पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून २०२१ मध्ये आपल्या विवाहाची माहिती दिली होती. मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आग्रही असलेल्या आणि चळवळ उभी केलेल्या मलालावर २०१२ मध्ये तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी मलाला अवघ्या ११ वर्षांची होती. त्यानंतर तिच्यावर ब्रिटनमध्ये दीर्घकाळ उपचार करण्यात आले. आपली प्रकृती सुधारल्यानंतर मलालाने ब्रिटनमधूनच तिचं कार्य सुरू ठेवलं होतं. २०२१ मध्ये मलालाने लग्न केलं. असर मलिक हे मलालाचे पती आहेत. ते क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.