सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या घटनांचे व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही घटना मजेशीर असतात तर काही भयानक असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारासाठी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली आहे. तुम्ही म्हणाल यात व्हायरल होण्यासारखं काय आहे? परंतु या केकवर कर्मचाऱ्यांनी आपल्या मित्रासाठी जो मजकूर लिहिला आहे तो खूप मजेशीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तू आमच्यासाठी मेला आहेस’

आपण आपल्या कुटुंबीयांसाठी किंवा मित्रांसाठी केक आणतो, त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा, किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट असा मजकूर लिहितो. शिवाय ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचं नाव आपण केकवर लिहित असतो. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील केकवर लिहिलं आहे, “तू आमच्यासाठी मेला आहेस, तुला कायमचं गुड बाय” या केकवर कर्मचाऱ्यांनी असा मजकूर का लिहिला आहे ते जाणून घेऊया.

हेही पाहा- अर्शदीपने स्टंप्स तोडताच पंजाब किंग्जची मुंबई पोलिसांकडे तक्रार; पोलिसांनी दिलेला जबरदस्त रिप्लाय होतोय Viral

हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या बेकरी मालकाने सांगितले की, कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर त्याच्या मित्रांनी हा केक ऑर्डर केला होता. अनेकदा ऑफिसमधील कर्मचारी आपले खास मित्र बनतात, या मित्रांसमोर आपण ती कंपनी सोडून जायचा विचार केला तर ते आवडत नाही. असाच काहीसा प्रकार या व्हायरल घटनेमध्ये झाला आहे. एक कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना सोडून दुसऱ्या कंपनीत जात असल्यामुळे मित्रांना राग आला आणि त्याला निरोप देण्यासाठी जो केक आणला होता त्यावरती वरील मजकूर लिहिला.

हेही वाचा- पैशाचा मोह नडला! तांत्रिकाने आकाशातून पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत घातला लाखोंचा गंडा

@trashyqweenz नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओला सध्या खूप व्हायरल होत आहे. शिवाय अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ऑफिसमधील बेस्ट फ्रेंडनी कंपनी सोडल्यावर खूप त्रास होतो. ज्याने हा केक बनवला त्या व्यक्तीचे दुःख मी समजू शकतो. तर आणखी एकाने लिहिलं, जेव्हा माझ्या एका सहकाऱ्याने नोकरी सोडली तेव्हा मी त्याच्यासाठी केकवर “गुड बाय गद्दार” असं लिहिलं होतं. तर दुसऱ्या एका व्यक्तीने, जर माझ्या कंपनीच्या लोकांनी माझ्यावर इतके प्रेम केले असते तर मी रडलो असतो असं म्हटलं आहे.