Kolkata Metro Viral Video: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोलकाता मेट्रोमध्ये एक महिला दुसऱ्या बंगाली महिलेला हिंदीत बोलण्यास सांगते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती महिला बंगाली महिलेशी हिंदीत न बोलण्यावरून वाद घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. काही लोक महिलेची मागणी योग्य मानत आहेत तर काहीजण चुकीचे मानत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेने म्हटले आहे की, “भारतात राहून तुम्हाला बंगाली येते, हिंदी नाही? तुम्ही बांगलादेशात नाही, हिंदीत बोला, बंगालीत नाही!” ज्यावर दुसरा प्रवासी बंगालीमध्ये म्हणाला, “मी पश्चिम बंगालमध्ये राहते, तुमच्या गावी राहत नाही. तुम्ही माझ्या राज्यात राहून बंगालीत बोलल्याबद्दल माझा अपमान करू शकत नाही.”
हेही वाचा –बाप रे! मिनीरोबोटने केले १२ मोठ्या रोबोट्सचे “अपहरण”, चीनमधील सत्यघटना! Video ViraL
प्रवाशांमध्ये वाद
इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला म्हणाले, “मेट्रो तुमची नाही, पश्चिम बंगाल तुमची नाही.” त्यावर बंगाली महिला म्हणाली, “ही मेट्रो माझी आहे आणि पश्चिम बंगालही माझी आहे. मेट्रो बंगालच्या करदात्यांच्या पैशांनी ही सुविधा निर्माण केली आहे, तुमच्या गावाच्या कर वापरून तयार केली नाही.”आसपासचे लोक देखील वादात सामील होतात आणि महिलेला विचारतात की,”ती स्वतः इंग्रजीत का बोलत आहे. संतप्त हिंदी भाषिक महिलेने बंगाली महिलेला ‘बांगलादेशी’ म्हटले. ‘, ज्यामुळे वाद आणखी वाढला.
हेही वाचा –‘इंकेम इंकेम कावाले’ गाण्यावर चिमुकलीचा अफलातून डान्स, Viral Video पाहून तिच्या प्रेमात पडाल
सोशल मीडियावर लोकांमध्ये फूट पडली
हा व्हिडिओ आतापर्यंत ८५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक लोक हिंदी महिलेला दोष देत आहेत की,”तिने इतर भाषा आणि त्या बोलणाऱ्या लोकांचा आदर केला पाहिजे.” तर काहींचे म्हणणे आहे की,”ही महिला जबरदस्तीने लढत आहे.”