Viral Video: सध्या केक, पेस्ट्री व बेकरी उत्पादने विकत घेण्यासाठी अनेक केक बास्केट; तर काही ऑनलाइन दुकानेदेखील उपलब्ध आहेत. पण, या सगळ्यात रोज सकाळी सायकलवरून ट्रिंग ट्रिंग करीत एक विक्रेता पेटीतून तुमचे आवडते बेकरीचे पदार्थ घेऊन यायचा हे तुम्हाला आठवतंय का? हो… तर त्याच्या पेटीत पाव, नानकट बिस्किटे, क्रीम पाव, रोल यांबरोबर ‘पेस्ट्री’सुद्धा असायची; जो खाण्याचा हट्ट तुम्हीही आई-बाबांकडे नक्कीच केला असेल. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका महिलेने या लहानपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे आणि तिची एक अनोखी गोष्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ नैनितालचा आहे. @seep.bora इन्स्टाग्राम युजर लहानपणी नैनितालला गेली होती. तेव्हा तिथे एक विक्रेता डोक्यावर बॉक्स घेऊन पेस्ट्री व काही बेकरीचे पदार्थ विकण्यासाठी तेथे आला होता. स्पंजसारखा केक आणि त्यावर क्रीमी टेक्श्चर, अशा स्वरूपात त्या विक्रेत्याकडे मिळणारी पेस्ट्री खूपच स्वादिष्ट होती. त्यानंतर २०२१ मध्ये तिने त्या विक्रेत्याचा नंबर घेतला आणि त्याच्याबरोबर एक फोटो काढला. पण, त्यानंतर काही वर्षांनी महिलेचा फोन चोरीला गेला. तसेच नैनितालमध्ये तो एकटाच विक्रेता असा होता; जो या पेस्ट्री विकायचा. मग महिलेची त्या विक्रेत्याबरोबर पुन्हा भेट झाली का, तिने त्या पेस्ट्रीचा पुन्हा स्वाद घेतला का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘ये किस्सा है अपनों का…!’ अनेक वर्षांपासून चालवतायत चहाचे दुकान; पण ‘या’ एका गोष्टीद्वारे त्यांनी जिंकलीत चहाप्रेमींची मने; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, नैनितालला पेटीतून पेस्ट्री विकणाऱ्या त्या विक्रेत्याचा नंबर घेण्यासाठी ती महिला पुन्हा नैनितालला आली. शेवटी महिलेने त्याला शोधले, त्याचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आणि तिने पेस्ट्री विकणाऱ्या विक्रेत्याची एक छोटी झलकदेखील व्हिडीओत दाखवली. तसेच त्या विक्रेत्याबरोबर फोटो काढून, तिने काही पेस्ट्री घरीदेखील आणल्या आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @seep.bora या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अनेक वर्षांनंतरही पेस्ट्रीची चव तशीच आहे’, असा मजकूर तिने व्हिडीओवर लिहिला आहे. तसेच कॅप्शनमध्ये तिने ही गोष्ट सविस्तर लिहिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून, त्यांच्या भावना कमेंट्समधून व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “आता मिळणारा कोणताही फॅन्सी चहा किंवा इतर पदार्थ या पेस्ट्रीसारखं सुख देऊ शकत नाहीत.” तर काही जण कमेंट्समधून या पेस्ट्री खाण्याची इच्छा व्यक्त करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You remember having these pastries from carrying a tin steel box women told her story and sharing video of this seller must watch asp
Show comments