काल, म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत स्वतंत्र होऊन तब्बल ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाचा स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी खास होता. या दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले होते. पण ही झाली शहरातील गोष्ट. भारतात अशी अनेक गावे आहेत जेथे सोयीसुविधा मुबलक प्रमाणात नाहीत. पण अशा ठिकाणीही मनोभावे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे.
लहान मुलांचे बोबडे बोल ऐकायला फार छान वाटतात. ते जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं अनेकांना वाटलं असेल. लहान मुलं बडबडगीते, कविता म्हणत असतात फारच गोंडस दिसतात. अशाच एका लहानग्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांना याचे बोबडे बोल फारच भावले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अद्याप हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे हे समजलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वच मंत्रमुग्ध झाले आहेत. या व्हिडीओमध्ये आपण एका लहान मुलाला आपल्या देशाचे राष्ट्रगीत गाताना पाहू शकतो. या मुलाला नीट बोलता येत नाही आहे, तरीही तो डोळे घट्ट बंद करून संपूर्ण राष्ट्रगीत गाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
Viral News : दोन वर्षाच्या मुलीवर सापाने केला हल्ला; चिडलेल्या मुलीने सापाचा चावा घेतला अन्….
व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख ६० हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत असून या चिमुकल्याचा तुलना आजच्या काळातील बेजबाबदार आणि राष्ट्रगीतही पाठ नसणाऱ्या कार्यकर्त्यांशी केली आहे.