सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कितीतरी व्हिडीओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात तर काही भावूक करतात. मात्र सध्या व्हायरल होणार हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. बाईक चालवताना हेल्मेट घालणे किती महत्त्वाचे आहे याचा प्रत्यय तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरोखरच मृत्यूच्या दारातून परत आला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये आपण एक सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतो. या सीसीटीव्ही फुटेजनुसार, समोरून एक बस रस्त्यावर येत आहे. त्याचवेळी एका दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो बसच्या मागील चाकाखाली येतो. हा व्हिडीओ अतिशय भयानक असून तो बघून तुमच्याही काजळात धस्स होईल.

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

बहुतेकांना वाटलं की हा इसम वाचू शकणार नाही. मात्र सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्याचा जीव वाचला आणि मोठा अपघात टळला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत त्याला वेळीच तिथून उचलले आणि त्याची मदत केली. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हेल्मेट घाला आणि सुरक्षित राहा, असे उगाच म्हटलं गेलं नाही.”

हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून आता पर्यंत या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर त्याला १४ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले असून पाच हजाराहून अधिक लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला गेला आहे. इतकंच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You too will be shocked after seeing the viral video of the accident pvp