सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. लोकांना आपले कलागुण इतरांसमोर सादर करता येतात. तसेच, तात्काळ लोकांच्या प्रतिक्रियाही मिळवता येतात. आता तर तरुण मुलं-मुलीच नाही, तर वयस्कर मंडळीही या माध्यमाचा वापर करून लोकांच्या समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. याची कल्पना आपल्याला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून येऊ शकते. या व्हिडीओमध्ये ६३ वर्षांची एक महिला ‘हलामिथी हबीबो’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हालाही संकोच वाटत असेल तर तुम्ही रवि बाला शर्मा उर्फ डान्सिंग दादी यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकता. वयाच्या ६३व्या वर्षी देखील त्या आपली आवड जोपासत आहेत. आणि यासाठी त्यांचे खूप कौतुक देखील होत आहे. सोशल मीडियावर सध्या डान्सिंग दादीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असून लोकांना ते फारच आवडत आहेत. नवीन आणि जुन्या गाण्यांवरील त्यांचे एनर्जेटिक डान्स सर्वांची मनं जिंकत आहे.
पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर डान्सिंग दादी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रवि बाला शर्मा गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेन्सेशन बनल्या आहेत. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. नुकताच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या विजय थलापतीचे ट्रेंडिंग गाणे ‘हलमथी हबीबो’वर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स सर्वांनाच आवडल्या आहेत.