भारतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही अन्याय होत असल्याचं आपण पाहतोय. तसेच काही लोक असेही आहेत जे शेतकऱ्याला कमी लेखतात. भारतात शेतकरी अप्रत्यक्षपणे गुलाम आहेत, कारण भारत हा शेतीप्रधान देश आता राहिलेला नाही, तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर शेतीचा काहीही परिणाम होत नाही, असा खोटा समज रूजवण्याचं काम सध्या सुरू आहे. यात सर्वात जास्त उन्हाचा चटका न बसलेल्या आणि आभाळापेक्षा, वेतन आयोगाकडे नजर लावून बसलेल्या, पगारी लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान असंच एक संतापजनक प्रकरण सध्या समोर आलं आहे. एका शाळेच्या मुख्यध्यापकांनी शेतकऱ्याविरोधात केलेल्या विधानावर सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
चिनमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका विद्यार्थ्याच्या घरी भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. झालं असं की एका मुलाला शाळेत बरं वाटत नसल्यानं त्याची आईनं त्याला शाळेतून लवकर घरी घेऊन गेली. याला विरोध करत हेनान प्रांतातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाच्या अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि कुटुंबाला भेट देण्याचा निर्णय घेतला.
‘तुम्हाला त्याला शेतकरी बनवायचे आहे?’
मुलाच्या निवासस्थानी पोहोचल्यावर मुलगा घराच्या बाहेर खेळताना दिसताच मुख्यध्यापकांचा पारा चढला आणि त्यांनी मुलाच्या आईला सुनावले. यावर मुलाच्या आईनं “माझ्या मुलाला बरे वाटत नाही, समजत नाही का? शाळेत अर्धा दिवस सुट्टी घेणे चुकीचे आहे का?” असे प्रत्युत्तर दिले. यावर मुख्यध्यापकांनी ‘तुम्हाला त्याला शेतकरी बनवायचे आहे?’ असा सवाल केला. शेतकऱ्यांना कमी लेखणाऱ्या मुख्यध्यापकांवर नंतर चांगलीच टीका झाली.
हेही वाचा >> Video: नो फोटो प्लिज! चिडलेल्या हत्तीचा तरुणावर हल्ला; केरळमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
सोशल मीडियावर टीकेची झोड
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. एका यूजरने लिहिले की, “ती एक जबाबदार प्राचार्य असणे आवश्यक आहे. ती केवळ विद्यार्थ्याच्या घरी जाण्यासाठी वेळ काढत नाही, तर ती आईला समजवण्याचा खूप प्रयत्न करते.” “मुख्याध्यापकांची वृत्ती अतिशय उद्धट आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.”आई बरोबर आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले