भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही. दररोज आपल्या आसपास आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे जुगाडू लोक पाहायला मिळतात. शिवाय काही काही लोक तर असा काही जुगाड करतात ज्याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक जुगाडू व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो शेअर करण्याचा मोह खुद्द अभिनेता रितेश देशमुखलाही आवरता आला नसल्याचं दिसत आहे.
खरं तर लहान मुले सतत घरातील माणसे कुठे बाहेर निघाली की त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट करतात. त्यामुळे अनेकदा त्यांना घेऊन बाईकवरुन फेरफटका मारवा लागतो. पण कधी कधी गावाकडील लोक रानात किंवा काही कामानिमित्त बाहेर जात असताना मुलांना बाईकवरुन घेऊन जाणं अशक्य असतं. पण सध्या सोशल मीडियावर अशा एका जुगाडू बापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो कामानिमित्त बाईकवरुन बाहेर गेला आहे आणि यावेळी त्याने एका चिमुकल्याला चक्क दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या किटलीमध्ये बसवलं आहे.
हेही पाहा- दुचाकीवरील तरुणाने ओढणी ओढल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू…, अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ आला समोर
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी लोकांना गाय किंवा म्हशीचे दूध देऊन घरी परतत आहेत. यावेळी त्याचा मुलगाही त्यांच्याबरोबर आहे. घरी परतत असताना दुधाची किटली रिकामी झाल्यावर वडिलांनी मुलाला बाईकच्या मागे किंवा पुढे बसवण्याऐवजी थेट बाईकच्या बाजूला अडकवलेल्या रिकाम्या दुधाच्या किटलीत उभे केलं आणि ते बाईकवरून घराकडे निघाले आहेत.
व्हिडिओमध्ये, दुधाच्या किटलीमध्ये चिमुकला आरामात उभा राहिल्याचं दिसत आहे. शिवाय तो खूप बिनधास्तपणे किटलीत उभा आहे. त्याला आपण पडेल याची थोडीही भिती वाटत नसल्याचं दिसत आहे. उलट त्याला हा प्रवास करताना खूप आनंद होत असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत सहसा लहान मुले रडताना दिसतात, मात्र हा मुलगा अतिशय शांतपणे उभा आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तर अनेकांना तो आवडल्याचंही पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुखने शेअर केला भन्नाट व्हिडीओ –
हा व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘जुगाडू बाप’ असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटलं की, भारतात काहीही होऊ शकते. तर दुसर्या वापरकर्त्याने चिंता व्यक्त करत लिहिलं आहे, कल्पना छान आहे पण मुलाची काळजी देखील घ्या. तर अनेकांनी हा अप्रतिम जुगाड असल्याच्या कमेंट केल्या आहेत.