सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देशी जुगाडाच्या व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. जगभरातील अनेक लोक आपलं काम सोप्पं आणि कमी वेळात व्हावं यासाठी वेगवेगळे जुगाड करत असतात. यामध्ये कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी विटांच्या साह्याने कुलर बनवतो. शिवाय या लोकांचे जुगाड इतके भन्नाट असतात की, मोठमोठे उद्योगपतीदेखील त्याची दखल घेत असतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या आणि भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये काही मजुरांनी असा भन्नाट जुगाड केला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरी त्यांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. कारण या जुगाडाचा बांधकाम मजुरांना चांगला उपयोग होत आहे, शिवाय जुगाडामुळे मजुरांचे कष्टदेखील कमी झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
@TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या जुगाडाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काही कामगार एका घराची भिंत बांधताना दिसत आहेत. मात्र, या कामगारांनी काम करताना एक अनोखी युक्ती वापरली आहे. यावेळी त्यांनी दोन लाकडी फळीच्या एका टोकाला दोन कामगार बसवल्याचं दिसत आहे. तर आणखी दोन कामगार ती फळी उचलत आहेत. मागील मजुरांनी फळी उचलल्यामुळे खाली ठेवलेल्या विटा भिंतीचे बांधकाम करण्यासाठी उंचावर असणाऱ्या मजुराच्या हातात अगदी सहजपणे देता येत आहेत.
हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून तो आतापर्यंत २.५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा देशी जुगाड पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. तर या जुगाडमुळे मजुरांचा काम करण्याचा वेग वाढला असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने या जुगाडामुळे मजूर कमी कष्टात अधिक काम पूर्ण करत असल्याचं म्हटलं आहे.