मांजर आणि कुत्रे माणसांसोबत राहणारे पाळीव प्राणी आहेत. मांजर खासकरून उंदरांची शिकार करण्यासाठी घरात पाळली जाते. उंदारांचा उच्छाद मांजर कमी करते. मांजरीची शिकार करण्याची पद्धत सर्वांचं लक्ष वेधून घेते. म्हणूनच मांजरीला वाघाची मावशी बोललं जातं. आता एका मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात मांजरीने माशाची शिकार एका झटक्यात केल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेटकरी हा व्हिडीओ पाहून आवाक होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये तलावाच्या काठावर एक मांजर शिकारीसाठी बसलेली दिसत आहे. त्यानंतर मांजर अचानक पाण्यात आपला पंजा मारते आणि एका मोठ्या माशाला आपले शिकार बनवते. शिकार करताना मांजर पूर्णपणे शांत दिसते आणि थोडीशी हालचाल करत नाही. जसा मासा पाण्याच्या पृष्ठभागावर येतो तशी ती त्याची सहज शिकार करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच त्याखाली मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत.