सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही मजेशीर व्हिडीओंचा समावेश असतो तर काही आश्चर्यचकीत करणारे. मात्र, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचं मनोरंजन तर होणार आहेच, पण तुम्हाला आश्चर्याचा धक्कादेखील बसणार आहे. हो कारण आजपर्यंत तुम्ही गाण्याच्या तालावर फक्त घोड्यांना नाचताना पाहिलं असेल पण या व्हिडीओमध्ये चक्क एक उंट घोड्यासारखे पायवर करून नाचताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उंटाला अशा प्रकारे नाचताना पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, कारण उंट फक्त नातच नाही तर खाटेवर ठेवलेल्या आणखी एका खाटेवर चढून तो घोड्यासारखे पायवर करताना दिसत आहे. आतापर्यंत लग्नसमारंभात घोड्यांना पाय वर करुन नाचताना पाहिली आहे, पण या व्हिडिओमध्ये उंटाला घोड्यासारखं नाचताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- “गावातील लोक आपले आयुष्य…” गावकऱ्यांच्या अनोख्या खेळाची उद्योगपती हर्ष गोयंकांना पडली भुरळ, Video पाहून नेटकरी म्हणाले…

व्हिडीओत गाणे वाजवताच उंट घोड्यासारखा नाचायला सुरुवात करतो. शिवाय यावेळी एका खाटेवर दुसरी खाट ठेवली आहे, ज्यावरती चढून उंट नाचत आहे. उंटाच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. उंटाच्या अनोख्या डान्सचा व्हिडीओ liveindiasabsefast नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘उंटाचा डान्स’ असें लिहिण्यात आलं आहे. तसेच हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will be amazed to see this viral video of this camel dancing on the bed like a horse trending news jap
Show comments