Puneri car: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनांच्या मागे लिहिलेला संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत असे. अनेकदा सुविचारांसह सामाजिक जागृती करण्याचे काम या संदेशातून केले जात असे. हा ट्रेंड हळूहळू चारचाकी वाहनांपर्यंत आला. अशाच एका पुण्यातील एका कारनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ही कार तुम्हीही म्हणाल पुणे तिथे काय उणे? याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रस्त्यावर धावणारी वाहनं कायम आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्याचा आकार, रंग आणि फिचर्सची कायम चर्चा होत असते. महागड्या कारची चर्चा तर जोरदार होत असते. मात्र या व्यतिरिक्त गाड्यांवर असलेले नंबर प्लेट्स लक्ष वेधून घेतात.सगळ्यांनाच माहिती आहे की, पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ सार्वजनिक आणि व्यावसायिकपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांना दिली जाते. भारतात धावणाऱ्या बहुतांश बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. त्यासोबतच व्यावसायिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. यात ट्रेलर, ट्रक, मिनी ट्रक यासारखे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांकडे व्यावसायिक वाहनचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.

a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

“मर्सिडीजला पिवळी नंबर प्लेट हे फक्त पुण्यातच”

हीच नंबर प्लेट चक्क आलिशान कार मर्सिडीज बेंझला लावली आहे. एवढी महाग कार व्यावसायिक वाहतूकीसाठी वापरल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया वर झाल्या आहेत. अशाच एका पुणेकरानं ही पुण्यात रस्त्यावर दिसलेल्या या कारचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. मर्सिडीजला पिवळी नंबर प्लेट हे फक्त पुण्यातच असं कॅप्शनही लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लोकांच्या जीवाशी खेळ! महिलांनो बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ 27_mp4 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “अस्सल पुणेकर”, “पुणे तिथे काय उणे?” “मुंबईतही हे पाहायला मिळतं” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पुणेरी नेटकरी देत आहेत.

Story img Loader