Farmer Desi Jugaad Video Viral : आताच्या हंगामात भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी टॉमेटोची शेती केली जात आहे. हजारो क्विंटल टॉमेटो एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जात आहेत. यासाठी मोठ मोठ्या वाहनांचा वापर केला जातो. या ट्रकमध्ये टॉमेटो ठेवण्यासाठी कुणी मशिनचा वापर करतात, तर कोणी कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये टोमॅटो भरतात. ट्रॉलीमध्ये टॉमेटो भरतानाचा असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक शेतकरी मशिनपेक्षाही जास्त वेगाने टॉमेटो ट्रकमध्ये लोड करताना दिसत आहे. त्याची ही टेक्निक पाहून फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स तिन्ही गडबडले आहेत. कारण या शेतकऱ्याने टॉमेटोच्या बादलीला ज्याप्रकारे पलटी करून ट्रकमध्ये टॉमेटो फेकले आहेत, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टॉमेटो फेकण्याची भन्नाट टेक्निक पाहिली का?

ट्वीटरवर हा व्हिडीओ आयपीएस रुपीन शर्मा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत कॅप्शन देत म्हटलं आहे की, ‘फिजिक्सच्या सिद्धांताला लागू करा आणि हे समजून घ्या’. काही कामगार टॉमेटोला बादलीत भरून ट्रकमध्ये लोड करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यामध्ये एक जण जो ट्रकच्या जवळ उभा आहे, तो टोमॅटोला ट्रकवर फेकत आहे. टॉमेटो ट्रकमध्ये थेट जातात आणि बादली काही अंतरावर जाऊन सरळ पडते. या शेतकऱ्याचा अॅंगल आणि निशाणा इतका अचूक आहे की, एकही टोमॅटो खाली पडत नाही आणि बादली त्या ठिकाणी तशीच उभी राहते. व्हिडीओ पाहून असं वाटेल की जुगाड नाही तर ही जादू आहे.

नक्की वाचा – Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये समुद्र दिसतोय का? पण हा समुद्र नाही, एकदा क्लिक करून पाहा

इथे पाहा व्हिडीओ

ट्वीटरवर टोमॅटो फेकण्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि शेकडोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूज मिळाले आहेत. एका यूजरने या व्हिडीओला कमेंट करत म्हटलं की, पॉवर ऑफ अर्नोल्ड, ब्रेन ऑफ आइंस्टाईन. तर अन्य एका यूजरने म्हटलं, ही तर रजनीकांतची स्टाईल आहे. तसंच दुसरा एक यूजर म्हणाला, सर्व कामगार खूप मेहनत करत आहेत, सर्वांना देवाकडून आशिर्वाीद मिळो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will be stunned after seeing a farmer jugaad for loading tomatoes inside the truck trolley it is beyond science you must watch it nss