भारतात असे काही लोक आहे ज्यांना परदेशात फिरण्याची फार आवड असते. काही लोक परदेशातच जाऊन राहायचा प्लॅन करत असतात. पण आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे आणि तेथील वातावरणात राहणे ही सोपी गोष्ट नसते. कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहणे खूप महागात पडू शकते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, एक असा देश आहे जिथे राहण्यासाठी तुम्हाला ७१ लाख रुपये मिळणार आहे तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. सहाजिकच हे ऐकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण वास्तविकतेमध्ये एक असा देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तुम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की, असा कोणता देश एवढा दयाळूपणा दाखवत आहे? तर तो देश आयर्लंड. आयर्लंड सरकारने ही ऑफर दिली आहे कारण त्यांना आपल्या देशात लोकसंख्या वाढवायची आहे. यामुळेच त्याने अशी ऑफर घेतली आहे. सरकारचा हा उपक्रम ‘ऑर लिव्हिंग आयर्लंड’ धोरणाचा भाग आहे.

हेही वाचा – विकी कौशलने Obsessed गाण्यावर केलेला डान्स झाला ट्रेंड, लोकांना प्रचंड आवडला व्हिडिओ, ट्विटरवर मीम्सचा पाऊस

आयर्लंडमध्ये स्थायिक होणाऱ्यांना मिळणार ८०,००० युरो

आयर्लंडच्या अधिकृत सरकारी वेबसाइटनुसार, या धोरणाचा उद्देश कमी लोकसंख्या असलेल्या किंवा निर्जन ऑफशोअर बेटांवर लोकांना स्थायिक करणे आणि त्यांची भरभराट करणे हा आहे.’ऑर लिव्हिंग आयर्लंड’ ‘ पॉलिसीमध्ये ३० बेटांचा समावेश आहे. या धोरणाचा एक भाग म्हणजे या ३० बेटांवर राहणाऱ्या समुदायांना मदत करणे, जे मुख्य भूमीशी जोडलेले नाहीत. म्हणजेच, हे सर्व ३० बेट एक प्रकारे वेगळे वेगळे आहेत. या धोरणांतर्गत, आयर्लंडच्या ऑफ शॉअर बेटांवर स्थायिक होणाऱ्या नवीन रहिवाशांना सरकार ८०,००० युरो म्हणजेच एकूण ७१ लाख रुपये देणार आहे.

अटी काय आहेत?

  • आयरलँडमध्ये राहाणाऱ्या लोकांना सर्वात आधी ३० ऑफ शॉअर बेटापैकी कोणत्याही एका बेटावर जमीन खरेदी करावी लागेल.
  • प्रॉपर्टी अशी असली पाहिजे ज्याचा निर्माण १९९३ पूर्वी केला गेला आहे आणि जी गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून मोकळी आहे.
  • सरकारद्वारे जे ७१ लाख रुपये दिले जाईल ते खरेदी केलेल्या प्रॉपर्टीसाठी मेंन्टेन्ससाठी वापरले पाहिजे. म्हणजेच घराची नव्याने सुधारणा करण्यासाठी नव्याने निर्माण करण्यासाठी हे पैसे वापरले पाहिजे.

हेही वाचा – टॉयलेटमध्ये बसला होता व्यक्ती, शॉवरवर लटकणारा भलामोठा अजगर पाहून उडाला थरकाप अन्…

कसे करू शकता अर्ज
जर तुम्हाला आयर्लंड सरकार द्वारे सर्व अटी मान्य असतील तर १ जुलैपूर्वी यासाठी अर्ज करू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will get 71 lakh rupees to live in ireland country only this condition has to be fulfilled snk
Show comments