Unique Restaurant Menu Card Viral : अनेकदा घरचे तेच तेच जेवण खाऊन खूप वैताग येतो. अशा वेळी काहीतरी चमचमीत, चविष्ट खाण्यासाठी लोक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करतात. अनेकदा मित्र मंडळी, कुटुंबाबरोबर हॉटेलमध्ये एकत्र जात जेवणाचा आनंद घेतला जातो. पण असे एक रेस्टॉरंट आहे जिथे ‘कुछ नही’ खाण्यासाठीही ग्राहकांना पैसे मोजावे लागतात. तुम्ही हे वाचून जरा गोंधळला असाल ना. तसेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे ‘कुछ नही’ म्हणजे नक्की काय? तर कुछ नही हे एका पदार्थाचे नाव आहे. एका रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारचे अनेक पदार्थ आहेत; ज्यांची नावे अतिशय हटके पद्धतीची आहेत आणि त्यांची मेन्यू लिस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही कधी पाहिले नसेल असे मेन्यू कार्ड

एका रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये असेच काही पदार्थ पाहायला मिळतात; जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसतील किंवा ऐकलेही नसतील. मेन्यूमध्ये कुछ नई, कुछ भी, एज यू विश, नई तुम बोलो, नई नई तुम बोलो, बाबाजी का ठुल्लू’ अशा नावांचे काही पदार्थ आहेत. या सर्वांपुढे त्यांची किंमतही लिहिलेली आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये ‘कुछ नही’ खाण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रेस्टॉरंटचे नाव लिहिलेले नाही.

हेही वाचा – Video : अरे डोसा विकताय की सोनं! मुंबई विमानतळावर डोश्याची किंमत ऐकून लोक झाले चकित; म्हणाले, “मित्रा किडनी…”

लोक काय म्हणाले?

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर sarcasticschool_ नावाच्या पेजने शेअर केला गेला आहे; जो पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय की, यात ‘बाबू का थाना’ नाही आहे. दुसर्‍या युजरने लिहिलेय की, ‘पता नही’ असे नाव पाहिजे होते. तिसर्‍या युजरने लिहिलेय की, तुम्ही जे काही करीत आहात, ‘तुम जो कर रहे हो वही मेरे लिए कर दो- ५०० रुपये. अशा प्रकारे युजर्स पदार्थांना आणखी काही हटके नावे सुचवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.