इंटरनेटवर दररोज अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. कधीकधी कल्पनाही करता येत नाही असे काहीतरी पाहायला मिळते. अशा गोष्टी वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कलाकृती दाखवली आहे. ही कलाकृती अतिशय आश्चर्यजनक आहे.

आपण सर्वच जाणतो की कोणतेही चित्र झूम करताना, एका विशिष्ट मर्यादेनंतर त्याचे पिक्सेल फाटतात आणि चित्र वाईट दिसते. पण या व्हायरल झालेल्या कलाकृतीमध्ये असे होत नाही. ही अप्रतिम कलाकृती पाहून लोक गोंधळून गेले आहेत. एखादे चित्र इतकं झूम करून पिक्सल वेगळे दिसत नाहीत हे कसं होऊ शकतं, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी लढवली शक्कल; लोकलमधील इतर प्रवाशांना पण केलं सामील; पाहा नक्की काय झालं

वास्कन्ग (Vaskang) नावाच्या एका कलाकाराने हे डिजिटल पेंटिंग तयार केले आहे. @Vaskange या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ जवळपास दीड मिनिटांचा असून आपण यामध्ये पाहू शकतो की एक व्यक्ती सतत हे पेंटिंग झूम करत आहे. कितीही झूम केले तरी या पेंटिंगचे पिक्सेल्स दिसत नाही आहेत. ही पेंटिग जितकी झूम केली जाते तितके नवीन पेंटिंग आपण यामध्ये पाहू शकतो.

‘मला या जगात का आणलंय?’ लहानग्याचा वैताग पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू; हा Viral Video पाहाच

झूम करताना एका पेंटिंगच्या आत दुसरे पेंटिंग, दुसऱ्या पेंटिंगच्या आत तिसरे पेंटिंग, तिसऱ्या पेंटिंगच्या आत चौथे पेंटिंग आणि अशा प्रकारे किती पेंटिंग समोर येतात हे कळत नाही. एकूणच ही एक न संपणारी कलाकृती आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या अद्भुत व्हिडीओला आतापर्यंत साडे सोळा मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर याला १ मिलिअनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया यूजर्स या कलाकृतीवर प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक लोक या कलाकृतीच्या निर्मात्याचे कौतुक करत आहेत.

Story img Loader