Viral video: सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणून कुणालाच कमी समजू नका..

बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. असाच एक बिबट्या हरण, कोल्हा, मगर, माकडं नाहीतर चक्क खारुताईची शिकार करायला निघाला होता. आता तुम्हालाही वाटेल, एवढीशी खारुताई बिबट्यासमोर काय करणारे? असं बिबट्यालाही वाटलं. मात्र खारुताईला हलक्यात घेणं बिबट्याला चांगलंच महागात पडलं. खारुताईनं बिबट्यालाच असं नाचवलं की तुम्ही पाहतच राहाल. बिबट्याची अवस्था पाहून शेवटी तुम्हीही म्हणाल म्हणून कुणालाच कमी समजू नका..

बिबट्याने खारुताईच्या चपळाईसमोर हार कशी मानली पाहाच

व्हिडिओमध्ये सफरचंदाच्या झाडावर एक खारुताई बिबट्याला इतका त्रास देत आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला बिबट्यानं सफरचंदाच्या झाडावर चढून खारुताईची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खारुताईनं बिबट्याला असा चकवा दिला की बिबट्या अक्षरश: दमला.कधी झाडावर कधी झाडाखाली तर कधी खारुताई झाडाच्या खोडात लपून बसायची तर कधी बिबट्याच्या नाकाखाली येऊन त्याला फसवायची. बिबट्याही खूप चपळ होता, कधी तो एका उडीत झाडावरून खाली यायचा तर कधी झाडाच्या माथ्यावर पोहोचायचा. पण तरीही खारुताईच्या चपळाईसमोर बिबट्याचं काहीही चाललं नाही. शेवटी बिचारा बिबट्या शांतपणे तेथून निघून गेला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “कष्टाची किंमत करा भाजीपाल्याची नको” बाजारात शेतकऱ्याला आलेला अनुभव ऐका अन् तुम्हीच सांगा तुम्हाला ‘हे’ पटतंय का?

सोशल मीडियावर लेटेस्ट साइटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत १.२ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर मजेदार कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले… क्या बिबट्या बनेगा रे तू? दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… बिबट्याला खारुताईनं हरवलं, म्हणूनच कुणालाच कमी समजू नका..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You wont believe how a squirrel outsmarted a leopard in this video from africa goes viral on social media srk