Unique Public Toilet Video : सोशल मीडियाचे जग फारचं वेगळं आहे. कारण- तिथे अनेक विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा तर अशा काही गोष्टी व्हायरल होतात, ज्या आपण आयुष्यात पहिल्यांदाच बघत असतो. त्यात लोकांनाही चित्र-विचित्र गोष्टी पाहण्यात फार रस असतो. त्यामुळे अनेक युजर्स अशा विचित्र गोष्टींचे आधी व्हिडीओ, फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात. सध्या अशीच एक विचित्र गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय, जी तुम्हीदेखील आयुष्यात पहिल्यांदाच पाहत असाल.

तुम्ही प्रवासात असताना अनेकदा सार्वजनिक शौचालयात गेला असाल. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील शौचालयांतही गेला असाल. तुम्ही तिथे पाहिले असेल की, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा शौचकूप असतो. त्यात प्रत्येकाला प्रत्येक शौचकूपासाठी स्वतंत्र दरवाजादेखील असतो. पण, व्हायरल व्हिडीओमध्ये जगातील सर्वांत अनोखे शौचालय पाहायला मिळतेय. त्यात १० ते २० शौचकूपांना फक्त एकच मोठा दरवाजा आहे. हे शौचालय बांधताना प्रायव्हसी नावाच्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला गेला नसल्याचे स्पष्ट दिसतेय.

अनोख्या सार्वजनिक शौचालयाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या खोलीत भारतीय पद्धतीचे कमोड एकाला बाजूला एक अशा पद्धतीने बसवले आहेत, त्यापैकी एकाही कमोडवर झाकण नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कमोड अशा पद्धतीने बसवले होते की, जर दोन लोक एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कमोडवर शौचास बसले, तर ते दोघेही एकमेकांना स्पष्टपणे पाहू शकतात. याचा अर्थ असा की, कोणत्याही कमोडच्या बाजूने प्रायव्हसीसाठी कोणत्याही भिंती नव्हत्या.

सार्वजनिक शौचालयाचा हा अनोखा व्हिडीओ @global_informers_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये ‘चीनमध्ये असे शौचालय आहे, तुम्ही जाल का?’ असे लिहिले होते. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, मी तर पहिल्यांदाच असे शौचालय पाहत आहे. दुसऱ्याने लिहिले की, हे शौचालय आता तयार केले जात आहे. तिसऱ्याने लिहिले की, कम्युनिटी टॉयलेट. त्याच वेळी अनेक युजर्स या व्हिडीओवर हसण्याच्या इमोजी शेअर करीत आहेत.