Youth Performs Dangerous Stunt On Local Train Video Viral : मुंबई लोकल ट्रेन लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, काही प्रवासी लाखमोलाचा जीव क्षणातच कवडीमोल करतात. कारण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी तरुण मुलं जीवघेणी स्टंटबाजी करायला सुद्धा घाबरत नाहीत. इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी जीव धोक्यात टाकून काही प्रवासी ट्रेनमध्ये खतरनाक स्टंटबाजी करत असतात. अशाच प्रकारचा एका तरुणाचा स्टंटबाजीचा धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची रेल्वे पोलिसांनी दखल घेतली आहे. धावत्या ट्रेनमध्ये अशाप्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्ला-मानखुर्द दरम्यान रेल्वे प्रवासात असताना असताना एक तरुण मुलगा दरवाज्याजवळ असलेल्या पायऱ्यांवर उभा राहून स्टंटबाजी करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी नसतानाही या तरुण मुलाने स्वत:चा जीव धोक्यात टाकला. तरुणाचं हे धक्कादायक कृत्य कॅमेरात कैद झालं असून हा व्हिडीओ जसवंत सिंग नावाच्या ट्वीटर यूजरने शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करून रुळावरच उडी मारून ट्रेन सोडण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आहे. ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांनी तरुणाला म्हटलं की, पोलीस तुला पकडतील..त्यानंतर या तरुणाने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

नक्की वाचा – Robbery Video: महाराष्ट्र बॅंकेच्या ATM मध्ये चोरीचा डाव फसला, मास्क घालून आलेले चोरटे CCTV कॅमेरात कैद, पोलीस येताच…

इथे पाहा तरुणाच्या स्टंटबाजीचा धक्कादायक व्हिडीओ

तरुणाचा हा खतरनाक व्हिडीओ व्हायरल होताच सेंट्रल रेल्वे आरपीएफकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. ट्रेन तिळक नगर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्याचं रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी या ट्वीटवर रिप्लाय देत म्हटलं, या विभागात कोणत्याही प्रवाशाने ट्रेनमध्ये स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, तर अशा लोकांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young bor performs dangerous stunts in mumbai local train video viral railway police rpf takes action nss