Viral video: कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते. खरोखरच तशीच एक बातमी आहे. एका तरुणाला कुत्रा चावल्यानंतर तरुणांनही कुत्र्याला चावल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. मात्र आपल्याला त्रास देणाऱ्या कुत्र्याला या मुलानं चांगलीच अद्दल घडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओमध्ये एक मुलगा अक्षरश: रस्त्यावर झोपून कुत्र्यासोबत दोन हात करत आहे. तरुणावर हल्ला करण या कुत्र्याला चांगलंच महागात पडलं असून मुलाला त्या कुत्र्याचा राग येतो आणि तो कुत्र्याचा बदला घ्यायला लागतो. पुढे तो मुलगा कुत्र्याला भयंकर पद्धतीने चावताना दिसत आहे. ज्यामुळे कुत्रा जोरात ओरडतो. मात्र हा तरुण या कुत्र्याला सोडायचं काही नाव घेत नाही. शेवटी दोघही हिंसक झालेले असताना नेमकं काय घडतंय असं तुम्हालाही वाेल पण वेळीच आजुबाजूच्या इतर लोकांनी तरुणाला बाजूला केलं आणि कुत्रा तिथून पळून गेला.

हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ viral_ka_tadka नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young boy bite dog video viral on social media shocking and funny video srk