सध्या लोकसंख्या आणि त्यांना राहणाऱ्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या घरांसह त्यांच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना तर अगदी लहानसे घर घेतानाही दहा वेळा विचार करावा लागतो. मात्र, तुम्ही स्मार्टफोन, गृहोपयोगी वस्तू यांसारख्या गोष्टी ज्या ऑनलाइन साईटवरून मागवता, तेथून एखादे घरदेखील ऑर्डर करता आले तर?

हा कोणताही काल्पनिक प्रश्न नाही. कारण – अमेरिकेतील एका तरुणाने चक्क हे करून दाखवले आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय जेफ्री ब्रायंट या तरुणाने ॲमेझॉनवरून २६,००० डॉलर्समध्ये [२,१०,००० रुपये] एक फोल्डेबल घर मागवले आहे, अशी माहिती न्यूयॉर्क पोस्टने शेअर केल्याचे हिंदुस्थान टाइम्सच्या एका वृत्तावरून समजते. तसेच याचा व्हिडीओ जेफ्रिने स्वतः सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

हेही वाचा : आईचा Joke ऐकून कोमातून बाहेर आली लेक! पाच वर्षांनंतर दोघींच्या चेहऱ्यावर दिसला आनंद

सर्वप्रथम टिकटॉक, त्यानंतर एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमांद्वारे जेफ्रीने त्याच्या घराची एकूण संरचना आणि आतून कसे दिसते ते दाखवले आहे. त्यानुसार या घरामध्ये एकाच खोलीमध्ये छोटा हॉल आणि स्वयंपाकघर तयार केले आहे. त्यानंतर बाथरूममध्ये एक बेसिन, आरसा, कमोड आणि अंघोळीसाठी शॉवर अशी सुविधा दिलेली आहे. त्यानंतर शेवटी एक लहानशी बेडरूमसुद्धा या घरामध्ये आहे. या फोल्डेबल घराचे छत मात्र फार उंच नसल्याची तक्रार व्हिडीओमधील तरुण करत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या भन्नाट आणि आगळ्यावेगळ्या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहे, त्या पाहू.

एकाने, “वाह! फोल्ड करता येणारे घर मस्तच! मला वाटतं एलॉनदेखील अशाच घरात राहतो, फक्त ते अजून भारी आहे” असे म्हटले आहे. “या घराची एकूण किंमत काय आहे? म्हणजे, जमिनीची किंमत, त्यामध्ये ठेवलेल्या वस्तू, इलेक्ट्रिसिटी वैगरे?” असे दुसऱ्याने उत्सुकतेने विचारले आहे. तिसऱ्याने, “मलापण असं घर हवं आहे” असे लिहिले आहे.

हेही वाचा : Viral video : काय? प्रयोग म्हणून तरुण खातोय कच्चे चिकन! म्हणतो, “पोट दुखेपर्यंत…”

फोल्डेबल घराची झलक पाहा :

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर @rahsh33m या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत १६.९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader