Viral Video : सोशल मीडियावर महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही तरुण मंडळी राज्यांच्या गडकिल्यांना फुलांचे तोरण बांधताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गड किल्ले ही महाराष्ट्राची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला गडकिल्यांविषयी आपुलकी आणि प्रेम आहे. अशातच काही तरुणांनी गड किल्ल्यांविषयी त्यांचे प्रेम व्यक्त करताना ते गडकिल्ल्यांना फुलांचे तोरण बांधताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण सुरुवातीला फुलांनी भरलेले पोते खांद्यावरुन वाहून आणताना दिसत आहे. त्यानंतर काही तरुण या फुलांच्या लांब माळांनी गडकिल्ला सजवताना दिसत आहे. गडकिल्ल्यांना फुलांचे तोरण बांधताना हे तरुण उत्साही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
हेही वाचा : प्रेमसंबंधाचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
sahyadri_ani_me या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आधी तोरण राज्यांच्या गडाला, मगच आमच्या दाराला”
या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”असंच काम करत राहा, महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेलच” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “छान वाटलं पाहून.. जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम तुमच्या कार्याला दादा” काही यु्जर्सनी कमेंट्समध्ये ‘जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ’ अशा घोषणा देत मानवंदना सुद्धा दिली आहे.