Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी आपल्या देशातील व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ इतर देशातील असतात. आपल्या शेजारचा देश पाकिस्तानमधील सुद्धा काही व्हिडीओ सध्या आपल्या देशात चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चालत्या रेल्वेवर पाणी उडवणाऱ्या तरुणांना लोकांनी चांगली अद्दल घडवली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं प्रकरण काय आहे? त्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. (young boys were sprinkling water on Train then passengers beat them)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही तरुण दिसतील जे रेल्वे रुळाजवळ असलेल्या एका नळाजवळ उभे आहेत. या तरुणांनी त्यांची दुचाकी या नळाजवळ उभी केली आणि दुचाकीच्या मागच्या चाकाच्या मदतीने पाण्याचा फवारा उडवताना दिसत आहे.

Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Pune Police share a video Showed Cow waits patiently for traffic light to turn green Highlights road safety watch ones
‘नियम म्हणजे नियम…!’ सिग्नल पाहून थांबली ‘गाय’, वाहतूक नियमाचे पालन; VIDEO शेअर करीत पुणे पोलिसांकडून कौतुक
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Heart attack 30-Year-Old Employee Suffers Heart Attack
VIDEO: बिनभरवशाचं आयुष्य! हसत-खेळत काम करतानाच काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Pakistan railway station Video
कंगाल पाकिस्तानात रेल्वेतून उतरण्याची ही कोणती पद्धत? VIDEO आला समोर, नेटकरी म्हणाले, “भौतिकशास्त्र शिकले असते तर…”

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रुळावरून जेव्हा रेल्वे जाते तेव्हा हे फवाऱ्याचे पाणी रेल्वेवर पडते ज्याचा त्रास रेल्वेत प्रवास करणाऱ्या लोकांना होतो. लोकांच्या अंगावर पाणी पडताना पाणी हे तरुण जोरजोराने हसताना दिसत आहे.

हेही वाचा : VIDEO: बिनभरवशाचं आयुष्य! हसत-खेळत काम करतानाच काळाचा घाला; हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू

असं म्हणतात, कर्माची फळे भोगावी लागतात. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रेल्वे थांबते आणि प्रवासी रेल्वेतून खाली उतरतात आणि या तरुणांना रागाच्या भरात मारहाण करत अद्दल घडवतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, पाकिस्तानमध्ये रेल्वे प्रवासी आणि काही तरुणांमध्ये वाद. रेल्वेवर पाणी उडवत होते (या तरुणांना वाटले की रेल्वे थांबणार नाही, पण रेल्वे थांबली आणि प्रवाशांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांची दुचाकी देखील ताब्यात घेतली)

हेही वाचा : ब्रेन ट्युमरशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याचे स्वप्न पोलिसांनी केले पूर्ण! एका दिवसासाठी बनवले IPS अधिकारी, पाहा VIDEO

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पाकिस्तानमध्ये अशा घटना नेहमीच होत असतात” तर एका युजरने लिहिलेय, “पाकिस्तानमध्ये काहीही होऊ शकते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चांगले केले. चांगली अद्दल घडवली” अनेक युजर्सनी या मुलांवर जोरदार टीका केली आहेत.