सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही डान्स व्हिडीओ देखील असतात. व्हिडीओमध्ये काही लोक मजेशीर डान्स करतात तर काही लोक जबरदस्त डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक तरुणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तरुणीचा डान्स पाहून लोकांना दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची आठवण येत आहे. लोकांना तरुणीचा डान्स खूप आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे साई पल्लवी. अभिनयाबरोबरच ती नो-मेकअप लूक आणि भन्नाट डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. तेलुगू, तमिळ, मल्याळम या तीन सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘राऊडी बेबी’ हे गाणे साई पल्लवी आणि अभिनेता धनुष यांच्या ‘मारी २’ या चित्रपटातील आहे. या गाण्यावर धनुष आणि साई पल्लवीने भन्नाट डान्स केला होता. दोघांच्या डान्समुळे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर खूप चर्चेत आले होते. विेशेष म्हणजे या गाण्यातील अभिनेत्री साई पल्लवीचा डान्स पाहून लोक तिचे चाहते झाले होते. आता याच गाण्यावर एका तरुणीने केलेला डान्स पाहून लोकांना साई पल्लवीची आठवण येत आहे.

हेही वाचा – ऐकावे ते नवलंच! कारमध्ये मागची सीट काढून बसवले कमोड; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “रस्त्यात स्पीड ब्रेकर आला तर…”

हेही वाचा – प्रेमाच्या भांडणात एक मच्छर ठरला खलनायक! किशोरवयीन मुलीची प्रेमकथा झाली व्हायरल

इंस्टाग्रामवर @beatswithharnidhया अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी राऊडी बेबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.या तरुणीने अगदी साई पल्लवीसारखा भन्नाट डान्स केला आहे. तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. अनेकांना तिचा डान्स प्रचंड आवडला आहे. लोक कमेंट करून तिचे कौतूक करत आहे.

हेही वाचा – Optical Illusion : वाघ की, माकड! तुम्हाला या फोटोत सर्वप्रथम काय दिसले? उत्तरावरून ठरेल तुम्ही Practical आहात की, Creative?

व्हिडीओवर एकजण म्हणाला,”ही तर छोटी पल्लवी.”दुसरा म्हणाला,” काय उर्जा आहे तिच्या, शब्बास मुली!” तिसरा म्हणाला,”अप्रतिम!”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl danced on dhanushs rowdy baby song sai pallavi will be remembered after watching the video watch viral video snk