Young Girl died while performing on stage Viral Video: आजकाल कधी कोणाबरोबर कोणता वाईट प्रसंग घडेल ते सांगता येत नाही. अशातच अनेक आजार वाढू लागले आहेत आणि कमी वयातच त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. यात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घडना खूप घडत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला अशा घटनांचा समावेश आहे. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात डान्स परफॉर्मन्स करणारी तरुणी स्टेजवरच कोसळली.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात तीन तरुणी स्टेजवर डान्स परफॉर्म करताना दिसतायत. डान्स परफॉर्मन्स सुरू असतानाच त्यातील एक तरुणी खाली कोसळते.
हा व्हिडीओ @indiatodayne या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “स्टेजवर परफॉर्म करताना मुलीला हृदयविकाराचा झटका आला”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
indiatodayne च्या वृत्तानुसार गरुडुबा, ढेकियाजुली, आसाम येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान स्टेजवर डान्स करताना या तरुणीचा मृत्यू झाला. या १८ वर्षीय तरुणीचं नाव सृजना देवी असून, ती महाविद्यालयात विद्यार्थिनी होती.
लोकनायक अमिया कुमार दास कॉलेजमधील बीएस्सीच्या पहिल्या सत्रात शिकणाऱ्या या तरुणीने लक्ष्मी पौर्णिमा उत्सवामध्ये नृत्य सादरीकरणात भाग घेतला होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रेक्षकांना धक्का बसला. कारण- तिने खाली कोसळल्याच्या क्षणीच प्राण सोडले होते.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना याचा धक्का बसला आहे. तसेच या व्हिडीओवर त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “आजकाल बहुतेक लोकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि ते काही सेकंदांत मरण पावतात. याचं नेमकं कारण कळायला हवं.” तर दुसऱ्याने, “कृपया जंक फूड खाऊ नका. भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जंक फूड खाऊ नका. जिममध्ये जाऊन योगासने करा” अशी कमेंट केली.
दरम्यान, याआधीही असे अनेक प्रसंग घडले आहेत. एका घटनेत एका व्यक्तीचा जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.