सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात.
आजूबाजूचे भान न राखता, हे रीलवेडे रीलसाठी काहीही करायला तयार असतात. मग ते लोकांना त्रास होईल की नाही याचीही फिकीर करीत नाहीत. फक्त काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी हे लोक आपल्या मर्यादा ओलांडतात. सध्या सोशल मीडियावर एक असच व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक तरुणी सार्वजनिक ठिकाणी डान्स करत एका परदेशी माणसाला त्रास देते.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी जयपूर येथील अल्बर्ट हॉल संग्रहालयासमोर डान्स करताना दिसतेय. आजूबाजूच्या ठिकाणचे अनेक लोक या संग्रहालयाला भेट देण्यासाठी तिथे आले आहेत. या माणसांच्या गर्दीत एक परदेशी पर्यटकही हजर असल्याचे या व्हिडीओतून पाहायला मिळतेय. या संग्रहालयासमोर रील शूट करीत डान्स करणारी ही तरुणी मुद्दाम त्या परदेशी माणसाला त्रास देण्यासाठी डान्स करता करता त्याच्यावर आदळते. त्याला धक्का देते आणि माफी न मागता आपला डान्स सुरूच ठेवते. तिच्या या कृतीमुळे तो माणूस तिथून निघून जातो.
हेही वाचा… बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
हा व्हायरल व्हिडीओ @trollgramofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘रीलसाठी परदेशी पर्यटकाला दिला त्रास; जयपूर अल्बर्ट हॉल येथील व्हायरल व्हिडीओ’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच तीन तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला एक लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
हेही वाचा… “ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, जर कोणत्या मुलाने परदेशी महिलेबरोबर असे केले असते, तर त्याची पोलीस स्थानकाबाहेरची रील व्हायरल झाली असती. तर दुसऱ्याने, “तिच्यावर कायदेशीर कारवाई करा”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “काहीतरी लाज बाळगा. बिचारा भारतात फिरण्यासाठी आला आहे.”
© IE Online Media Services (P) Ltd