सोशल मीडियावर दर दिवशी कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात पण फार मोजके व्हिडिओ असतात जे खरचं बघण्यासारखे आणि कौतूक करण्यासारखे असतात. सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक आजकाल काहीही करत असतात पण काही व्हिडिओ असे असतात जे नेटकऱ्यांचे मन जिंकतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा व्हिडीओमध्ये तरुणीने जुन्या मराठी गाण्यांवर नृत्य केले आहे, विशेष म्हणजे तरुणीने आदिवासी पेहराव करून आदिवासी नृत्य सादर केले आहे. तरुणीचा हे नृत्य अनेकांना आवडले आहे. जुन्या गाण्यांना पुन्हा नव्याने जिवंत करण्याचा प्रयत्न या तरुणीने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जैत रे जैत चित्रपटातील हे गाणे चर्चेत

तुम्हाला जुनी मराठी गीत आवडत असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. “हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा” हे बोल कोण्या राजानं राजानं या मराठी गाण्यातील आहे. हे गीत ना. धो. महानोर यांनी लिहिले आहे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे, आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी हे गीत गायले आहे. जैत रे जैत १९७७ मधील जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांनी हा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा ठाकर आदीवासींच्या आयुष्यावर आधारित आहे.

हेही वाचा – ” चिं. भात आणि चि. सौ. कां. चपातीच्या लग्नाला यायचं बरं का!” आगळा वेगळा लग्नसोहळ्याची हटके लग्नपत्रिका , एकदा बघाच

हेही वाचा – Video : “अक्षय का विषय बहोत हार्ड है!”, अंघोळीला वैतागलेल्या चिमुकल्याने तयार केला भन्नाट रॅप; एकदा ऐकाचं, पोट धरून हसाल

स्मिता पाटीलच्या गाण्यावर तरुणीने सादर केलं सुंदर आदिवासी नृत्य

स्मिता पाटील यांनी चित्रपटामध्ये जशी आदिवासी वेषभूषा केली होती त्याप्रमाणे या तरुणीने वेषभूषा केली आहे. तरुणीने खणाचा ब्लाऊज आणि नऊवारी साडी परिधान केली आहे. आदिवासींप्रमाणे साडीचा पदर कंबरेला खोचलेला आहे. गळ्यात पारंपारिक दागिणे घातले आहेत आणि पायात पैंजन घातले आहे. केसांचा अंबाडा बांधून त्यात आदिवसी महिलांप्रमाणे पाणे लावली आहे. तरुणीची वेषभुषा आणि नृत्य दोन्ही सर्वांना प्रचंड आवडली आहे. निसर्गाच्या सानिध्यात तरुणीचे नृत्य पाहून सर्वांना जैत रे जैत चित्रपटातील स्मिता पाटील यांची आठवण होत आहे.

नेटकऱ्यांना आवडले तरुणीचे नृत्य

व्हिडिओ तुफान चर्चेत आला आहे. अनेकांनी तरुणीच्या नृत्याचे कौतूक केले तर काहींनी ना. धो. महानोर यांच्या गीताची प्रशंसा केली.
एकाने म्हटले, “नृत्य आणि वेषभुषा दोन्ही उत्तम आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “जैत रे जैत चित्रपटातील हे गाणे आहे, कवी ना. धो. महानोर यांनी लिहिले आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “खुप छान अतिशय सुंदर लय भारी कवी ना धो महानोरांचे हे गाणं पिक्चर जैत रे जैत”
चौथ्याने लिहिले की, ” खुप खुप सुंदर, अभिनंदन.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl performed a beautiful tribal dance on the songs of jait re jait movie smita patil viral video watch it once snk