Girl Craziness Viral Video : सोशल मीडियाच्या दुनियेत झटपट लोकप्रीय होण्यासाठी काही माणसं नको ते उद्योग करायला जातात. इंटरनेटवर प्रकाशझोतात येण्यासाठी एका तरुणीलाही विचित्र बुद्धी सुचली आणि तिच्यासोबत असं काही घडलं, जे पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा समोर येऊन भन्नाट पोज द्यायच्या आणि रील्स बनवून त्या सोशल मीडियावर व्हायरल करायच्या, असे उद्योगच काही जणांनी सुरु केल्याचं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येत आहेत. एक तरुणी तिच्या शरीराची लवचिकता पाहण्यासाठी आरशासमोर जाऊन एक प्रयोग करण्याच प्रयत्न करते. पण ती जेव्हा पोज द्यायला जाते तेव्हा तिच्यासोबत नेमकं काय घडतं, ते व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता. तरुणीचा हा बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रील बनवण्याच्या नादात तरुणीचीच झाली फजिती, पाहा व्हायरल व्हिडीओ

@shockingClip नावाच्या युजरे हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तरुणीने केलेलं भन्नाट कृत्य या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. तरुणी तिच्या पाठीवर टीशू पेपर ठेऊन शरीराची लवचिकता तपासण्याचा प्रयत्न करते. ती त्या रोलचा बॅलेंस ठेवण्या प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रोल पाठीवर ठेवल्यानंतर तरुणी खाली वाकण्याचा जेव्हा प्रयत्न करते, त्याचदरम्यान समोर असलेल्या भिंतीवर तिचं डोकं खूप जोरात आपटतं. तरुणी करायला जाते एक आणि घडतं भलतंच. तरुणी तिच्या शरीराची लवचिकता तपासायला गेल्यावर भिंतीवर डोकं आपटून तिची मोठी फजिती झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रील बनवण्याच्या नादात आपण भिंतीच्या अगदी जवळ आहोत, याचा विसरही त्या तरुणीला पडलेला दिसतो.

नक्की वाचा – टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यासाठी चक्क धावत्या ट्रेनमध्ये मारल्या पुश-अप्स, धावपटूंचा Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

घरी किंवा बाहेर असल्यावर स्टंटबाजी करताना अनेकांची फजिती झाल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यामातून अनेकदा आपण पाहिलं असेल. पण काही स्टंट्स मारण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्याने ट्रेनरचा योग्य सल्ला घ्यावा. एखादा स्टंट मारण्यासाठी तुम्ही जोपर्यंत भक्कम होत नाहीत, तो पर्यंत अशाप्रकारचे धोकादायक प्रयोग करणे तुम्हाला महागात पडू शकतं. स्टंटबाजी करून हिरोगीरी करण्यापेक्षा तुम्हाला स्वतं:ला सुरक्षित ठेवणं अधिक महत्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी करु नका, असं आवाहन सातत्याने लोकांना केलं जातं. व्हिडीओ बनवण्याच्या ओघात स्वत:च्या जीवाचा खेळ करणं, हे अतिशय धोकादायक असल्याचं जाणकार सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girl was doing bold stunts in bedroom see what happens next in shocking viral video on twitter nss