सोशल मिडियावर रोज काही ना काही चर्चेत येत असते. अनेकदा लोक ट्रेंड होत असलेल्या गाण्यावर व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये, मराठीमोठी थोडीशी साधीभोळी, गुलाबी साडी, अप्पाचा विषय लय हार्ड ए यांसारखी मराठी गाणी सोशल मीडियावर चर्चेत आली होती ज्यावर अनेकांनी रिल्स व्हिडिओ पोस्ट करून त्यांना प्रंचड प्रसिद्धी दिली. सध्या अशाच एका गाण्याची सर्वत्र पुन्हा चर्चा होत आहे. क्लब आणि लग्नाच्या वरातीमध्ये सध्या एकचं गाणे ऐकायला मिळत आहे, हे गाणे आहे “तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका..!” मराठी प्रेक्षकांना हे गाणे प्रचंड आवडलं आहे. त्यामुळे अनेकजण या गाण्यावर नाचताना दिसत आहे. सध्या या गाण्यावर नऊवारी साडी नेसून भन्नाट नृत्य सादर करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तांबडी चामडी गाण्यावर तरुणींचे अफलातून नृत्य
व्हायरल व्हिडीओमध्ये एका स्टेजवर तीन तरुणी तांबडी चामडी गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिघींनी नऊवारी परिधान केली आहे आणि या मराठी गाण्यावर अफलातून नृत्य करत आहे. गाण्याच्या बोल आणि संगीत दोन्हीला टक्कर देणारे नृत्य तिघींनी सादर केले आहे. स्टेजवर नृत्य करणाऱ्या तरुणींचे सर्वजण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून कौतूक करत आहे.
हेही वाचा –मुंबईतील फूड डिलिव्हरी बॉय बनला फॅशन शोमध्ये मॉडेल! पाहा त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा Video
तांबडी चामडी गाण्याचा संगीतकार कृणाल घोरपडे याने kratexmusic या त्याच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिघींचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले, तांबडी चांमडी गाण्यावर पाहिलेला आतापर्यंत पाहिलेला सर्वात उत्तम रिल्स दुसरा म्हणाला, “मराठी स्वॅग” तिसऱ्याने लिहिले, “मराठी वाजलंच पाहिजे”
हेही वाचा – “दिसतं तसं नसतं!” तुम्हाला व्हिडीओमध्ये पक्षी दिसतोय का? पुन्हा एकदा नीट बघा
तांबडी चामडी गाणे का होतंय ट्रेंड?
तांबडी चामडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होते आहे. कलाकरांनी देखील या गाण्यावर रिल्स व्हिडिओ बनवून पोस्ट केले आहेत. हे गाणे श्रेयस सागवेकर याने लिहिलं आणि कृणाल घोरपडे याने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याद्वारे त्यांनी संगीतसृष्टीत पदार्पन केले आहे. वर्ल्ड ऑफ वाईब्ज यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. आता तांबडी चामडी हे गाणे फक्त भारतात नव्हे तर जगभरात वाजणार आहे कारण या गाण्याचे प्रदर्शन स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर करण्यात आले आहे. जगभरातील लोक हे मराठी गाणं ऐकू आणि बघू शकतील.