सोशल मीडियावर सतत काही नाही काही चर्चेत असते. कधी कोणाचा डान्स तर कधी कोणाचं गाणे. सध्या अशाच एका डान्स व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे. स्त्री २ मधील श्रद्धा कपूरच्या “आयी नई” या लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना एका चिमुकलीच्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकलीने अप्रतिम डान्स केला आहे. या डान्सवर नेटकऱ्यांसह अभिनेत्री श्रद्धा कपूरला देखील आवडला आहे. व्हायरल व्हिडीओवर चक्क श्रद्धाने कमेंट करत चिमुकलीचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्री २च्या “काटी रात मैने..” गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘mitalis_dance,नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकली स्त्री २ मधील श्रद्धा कपूरच्या “आयी नई” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत आहे. तिच्या बरोबर असलेल्या मुली आश्चर्याने तिच्याकडे पाहात आहेत. चिमुकली गाण्याची प्रत्येक स्टेप अचूकपणे करत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. ज्या आत्मविश्वासाने ती डान्स करत आहे ते खरचं कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ७०,००० हून अधिक लाईक्स आणि लाखो व्ह्यूज आहेत, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Viral Video पाहून श्रद्धा कपूरनेही केले कौतुक

व्हिडिओला आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती श्रद्धा कपूरलाही व्हिडिओ आवडला आहे. एवढचं नाही तर तिने कमेंटही केली आहे. चिमुकलीचा आत्मविश्वासपाहून श्रद्धा देखील थक्क झाली, तिने लिहिले, “अरे वाह, असा आत्मविश्वास तर मला पण पाहिजे. उत्कृष्ट!”

हेही वाचा –व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणांचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video

श्रद्धा कपूरने केले चिमुकलीचं कौतुक

व्हिडिओला प्रतिसाद देताना, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने चिमुलीच्या अभिव्यक्तीचे कौतुक केले, तर दुसऱ्याने लिहिले, “तिचे नृत्य कौशल्य माझ्यापेक्षा चांगले आहे!” दुसरा वापरकर्ता म्हणाला, “अरे, अशा छान स्टेप केली.” कपूरच्या कमेंटनंतर, मुलीने आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केला, यावेळी स्त्री २ मधील “आज की रात” या गाण्यावर डान्स केला आहे आणि गाण्याच्या स्टेप्स अचूकपणे सादर केल्या आहेत.त्या व्हिडिओलाही हजारो व्ह्यूज मिळाले.

हेही वाचा –‘सजना वे सजना’ गाण्यावर राधिका मर्चंटचा अफलातून डान्स, मैत्रिणीच्या लग्नातील Video Viral! अंबानीच्या छोट्या सुनबाईंच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा

स्त्री 2 मधील “आयी नाई” आणि “आज की रात” सारखे गाणे लोकांचे आवडते ठरत आहे. विशेषतः डान्सरसाठी. या गाण्यांचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girls dance to stree 2 song goes viral earns praise from shraddha kapoor snk