महाराष्ट्रात जसा गणेश उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे केरळमध्ये ओणम हा सण उत्साहात साजरा केला जातो. ओणम हा कापणीच्या हंगामातील सण आहे. ओणम हा मल्याळी लोकांचा सण आहे. या दिवसांमध्ये केरळमध्ये ठिकठिकाणी नद्या व तळ्यांमध्ये होणाऱ्या बोटींच्या शर्यती पार पाडतात. विष्णुच्या वामण अवतार आणि बळीराज्याच्या कल्पित आगामनानिमित्ताने हा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवाप्रमाणेच हा दहा दिवसांचा सण आहे. मल्याळी कॅलेंडरमधील चिङ्ग्यम महिन्यातील पहिल्या दिवसापासून म्हणजेच मराठी कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थीपासून या सणाची सुरुवात होते. विष्णुच्या मंदिरात जाऊन यावेळी लोक त्यांची पुजा करतात. उत्सवाच्या या दहा दिवसात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये कथकलीसारखे शास्त्रीय नृत्य सादर केले जाते. ओणम सणानिमित्त तरुण-तरुणी पारंपारिक पोषाख परिधान करतात. सध्या ओणमनिमि्त्त कॉलेजमध्ये साडी नेसून आलेल्या तरुणींचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या गाण्यावर तरुणींनी अफलातून डान्स केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कुर्ची मदाथा पेट्टी गाण्यावर तरुणींनी केला भन्नाट डान्स

व्हिडिओ बहुदा एखाद्या कॉलेजमधील असावा असा प्राथमिक अंदाज आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ओणम सणानिमित्त या तरुणींनी सुंदर सुंदर साड्या नेसल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध गाणे कुर्ची मदाथा पेट्टी’ ( kurchi madthapetti ) नाचताना दिसत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या गाण्यावर तरुणींनी भन्नाट डान्स केला आहे. गाण्यातील सर्व डान्स स्टेप्स अचूकपणे सादर केल्या आहेत.

थेट महेश बाबूला दिली टक्कर

‘कुर्ची मदाथा पेट्टी’ हा त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित ‘गुंटूर कारम’ साठी एसएस थामन यांनी संगीतबद्ध केलेला एक प्रसिद्ध संगीत आहे. अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री श्रीलीला यांनी या गाण्यात अफालातून डान्स केला आहे. पण तरुणींनी या गाण्यावर भन्नाट डान्स करून थेट महेश बाबू आणि श्रीलीलाला टक्कर दिली आहे. नेटकऱ्यांना तरुणींचा हा डान्स प्रचंड आवडला आहे.

हेही वाचा – चिमुकल्याचा मराठमोळा स्वॅग! डोळ्यांवर गॉगल अन् कंबरेला ढोल बांधून वादन करतोय छोटा वादक, पाहा Viral Video

हेही वाचा – यालाच म्हणतात,”मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…!”, दिव्यांग मित्राच्या मदतीला धावून आला चिमुकला, निस्वार्थ मैत्रीचा Video Viral

नेटकऱ्यांना प्रचंड आवडला तरुणींचा डान्स

जवळपास ३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ पसंती दर्शवली आहे. इंस्टाग्रामावर rohitha_krishnan नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “‘कुर्ची मदाथा पेट्टी गाण्यावर डान्स करून ओणम साजरा केला.”

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले, मला डान्स पाहून खरचं मज्जा आली, मी पुन्हा पुन्हा पाहिला”

दुसरा व्यक्ती म्हणाला, “इतक्या अचूकपणे त्या कशा काय नाचत आहेत”

तिसऱ्याने लिहिले की, “ताई, खुप सुंदर डान्स केला, मी पुन्हा पुन्हा बघत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young girls dressed in saree and dance kurchi madathapetti song mahesh babu and sreeleela song netizen cant stop watching viral video snk