सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर कधी काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेत पास झालेला एक तरुण भावूक झालेला दिसत आहे. त्याच्यासह त्याची आजी सुद्धा भाऊ झालेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या आई डोळ्यात पाणी येईल. या तरुणाचा संघर्ष या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

स्पर्धा परीक्षेला दरवर्षी हजारो विद्यार्थी बसतात. निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आलाय.

Emotional video toddlers struggle to help family to work in garage heart touching video
आईशिवाय घर अपुरं अन् बापाशिवाय आयुष्य…कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते बघाच; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
success story police officer competitive examination education government service mpsc upsc marathi onkar gujar
VIDEO: अखेरचा हा तुला दंडवत…दीड फुटाचा डेस्क अन् त्यावर गाळलेला घाम; सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
The young women who boarded the AC local without tickets were released by the TC know the reason behind
“एसी लोकलमध्ये दिसली माणुसकी” पोलीस भरतीसाठी आलेल्या दोन तरुणींचा VIDEO होतोय व्हायरल

या व्हिडिओमध्ये एक तरुण गुलालाने माखलेला दिसत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. तो त्याच्या आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून आजी नऊवारीच्या पदरने त्याचे डोळे पुसत आहे. फक्त त्याची आजी नाही तर इतर आजीच्या वयातील महिला सुद्धा त्याला धीर देत आहे. आजीसह सर्व वृध्द महिला त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मायेने हात फिरवत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडिओवर लिहिलेय, “भावाचे अश्रू सांगतात किती कष्ट असतील. आई पाहिजे होती आता भावा यार. आजीचे प्रेम बघा भावांनो. परिस्थितीच्या छाताडावर बसून भावाचा दणदणीत विजय, याला म्हणतात जिद्द”

हेही वाचा –‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रेने लाडक्या बाप्पासाठी गायले गाणे, तुम्ही ऐकले का? पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडिओ

हेही वाचा – रेल्वे रुळ ओलांडताना पाय घसरून पडली महिला, अंगावरून धावली मालगाडी; थरारक घटनेचा Video Viral

spardhapariksha.mpsc.upsc या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा अभिनंदन” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ‘अभिनंदन भावा’ लिहत कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे ईमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. स्पर्धा परीक्षेला असलेले विद्यार्थी पास झाल्यानंतर आनंद साजरा करताना दिसतात.