Vangi Rassa Bhaji & Bittya : महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वेगवेगळी संस्कृती, बोलीभाषा दिसून येते. महाराष्ट्रात एकुण ६ विभाग आहे. या सहा विभागामध्ये वेगवेगळी खाद्यसंस्कृती दिसून येते. महाराष्ट्रातील सहा विभागापैकी लोकप्रिय विभाग म्हणजे विदर्भ. विदर्भ फक्त बोलीभाषेमुळे चर्चेत येत नाही तर येथील खाद्यसंस्कृती सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. येथील सावजी मटण, पाटोडी, कोथिंबीर वड्या लोकप्रिय पदार्थ आहे. चमचमीत व तिखट खाण्यासाठी विदर्भ प्रसिद्ध आहे.
कोणताही लग्न समारंभ असो किंवा शुभ कार्यक्रम विदर्भात तुम्हाला जेवणाच्या ताटात वांग्याची भाजी हमखास दिसेल. विदर्भात वांग्याच्या भाजीबरोबर बिट्ट्या आवडीने खाल्ले जातात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विदर्भातील काही तरुण मंडळी वांग्याची भाजी आणि बिट्ट्या तयार करताना दिसत आहे.
विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही तरुण मंडळी दिसेल. हे तरुण मंडळी चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. तरुण मंडळी चुलीवर वांग्याची भाजी आणि बिट्ट्या बनवताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही तरुण बिट्ट्यांसाठी पीठ मळताना दिसतात तर काही तरुण बिट्ट्या तयार करताना दिसतात. काही तरुण पातेल्याला माती लावताना दिसत आहे. तर काही तरुण वांगे बटाटे कापताना दिसत आहे. सर्व तरुण मंडळी अतिशय आनंदाने स्वयंपाक तयार करताना दिसत आहे. शेवटी तुम्हाला तरुण मंडळी जेवणाचं ताट सजवतात. ताटात वांग्याची भाजी, बिट्ट्या, वरण, भात, पापड, सॅलेड, चटणी वाढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : काय सांगता? पाणीपुरी विक्रेत्याने कमावले तब्बल ४० लाख! ऑनलाईन पेमेंट्स पाहून आयकर विभागाने पाठवली GST नोटीस
abhijeetbopte.exe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विदर्भ- वांग्याची भाजी आणि बिट्ट्या” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावांनो, एक नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “विदर्भातील बटाट्या वांग्याच्या भाजीला तोड नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “विदर्भातील मानाची भाजी – वांग्याची भाजी.. प्रत्येक पंगतीत वांग्याच्या भाजीला मान असतोच..” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.