Waitress Viral Video: आपण अनेकदा समाजात काही विकृत माणसांना मुलींची छेड काढताना पाहिलं आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना, महिलांना अपशब्द वापरून त्रास देणं, तर कधी त्यांचा पाठलाग करत त्यांची छेड काढणं असा विक्षिप्त प्रकार ते करत असतात. अनेकदा अशा लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा प्रसंगी काही मुली घाबरतात, तर काही जणींना स्वतःचं संरक्षण अगदी चांगल्या रितीने करता येतं.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला एका तरुणाने चुकीच्या पद्धतीने हात लावला. या घटनेत नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Video of girls undergoing training in Shivkalin martial art
Video : “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा” लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी, व्हिडीओ एकदा पाहाच
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी

हेही वाचा… VIDEO: घोड्यावरून उतरला अन् चालत्या ट्रकला लटकला, नवऱ्यामुलाने त्याच्याच लग्नात काय केलं पाहा

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये एक वेट्रेस ड्रिंक सर्व्ह करायला आलेली दिसतेय. टेबलवर ड्रिंक ठेवताच मागून एका तरुणाने तिला नको त्या जागी स्पर्श केला. ड्रिंक सर्व्ह करताच मुलीने मागे पाहिलं आणि ज्याने तिची छेड काढली त्याला हातातल्या ‘ट्रे’ने जोरात मारलं. त्याचबरोबर आजूबाजूला आणखी दोन मुलं होती, त्यांनाही तिने चांगलाच चोप दिला. यातून स्वत:च्या संरक्षणासाठी कसं खंबीरपणे मुलींनी उभं राहायला हवं हा धडा तिने सगळ्यांनाच शिकवला.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/C_QrFVpNZo4/

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @campus.univers.cascades या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बारमेडला स्पर्श करू नका” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल १९.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… …म्हणून मैत्री विचार करून करा! भररस्त्यात तरुणीचा स्कर्ट फाटला अन् मित्र हसायला लागला, पण पुढे जे घडलं ‘ते’ VIDEO मध्ये पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

वेट्रेसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिकिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्रत्येक मुलीने तिच्यासारखे प्रशिक्षण घेतले पाहिजे”, तर दुसऱ्याने, “खूप चांगला धडा शिकवलास” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मला तुझा अभिमान आहे मुली.”

Story img Loader