Viral News : अनेक तरुण मुले मली नोकरी आणि शिक्षणासाठी घर सोडून दुसऱ्या शहरात राहतात. इच्छा नसताना सुद्धा आईवडिलांपासून दूर राहतात. सोशल मीडियावर अशा तरुण मुला मुलींवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप भावूक करणारे असतात. आई वडिलांपासून दूर राहणाऱ्या अशा मुलांसाठी एका तरुणाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या तरुणाने आई वडिलांपासून दूर राहण्याचा खरा फायदा विचारला आहे. सध्या याच्या पोस्टची सगळीकडे एकच चर्चा आहे.
व्हायरल पोस्ट
तुषार मेहता नावाच्या तरुणाने tushaarmehtaa या त्याच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलेय, “जे लोक आईवडीलांपासून दूर राहतात, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला समजून घ्यायचे आहे घरापासून दूर राहून तुम्हाला काय फायदा होतो.
- गुंतवणूक करण्यासाठी कमी पैसे शिल्लक राहतात
- वाईट सवयी लवकर लागतात
- निरुपयोगी जबाबदाऱ्या
- खरंच काही फायदे आहेत की फक्त स्वातंत्र्य मिळते.”
पाहा व्हायरल पोस्ट
हेही वाचा : निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी कोणते फायदे मिळतात तर काही लोकांनी कोणते स्वातंत्र्य मिळतात, याविषयी सांगितले. एका युजरने लिहिलेय, “मी म्हणेन की स्वातंत्र्यापेक्षा स्वत:वर अवलंबून राहणे आणि स्वतःची काळजी घेणे शिकतो. तुम्ही घरी असल्यावर तुमचे खूप लाड केले जातात, तुम्हाला़ कपडे धुण्याची, जेवणाची काळजी नसते आणि घरगुती स्वच्छता करण्याची गरज नसते.” तर एका युजरने लिहिलेय, “मला माझ्या आई-वडिलांना एकटे सोडून एकटे राहणे अजिबात आवडत नाही पण मी माझ्या कुटुंबाचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी येथे आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी जॉइंट कुटूंबातील आहोत. माझे घरी काम होत नाही”